विराट कोहली, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, खालील अहमद, श्रेयस अय्यर आणि रोहित शर्मा (Photo Credit: @imVkohli/@ImRo45/Twitter)

3 ऑगस्ट पासून भारताच्या वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्याची सुरुवात होत आहे. भारतीय संघ (Indian Team) फ्लोरिडा येथे पहिला टी-20 सामना खेळेल. यासाठी भारतीय संघ मियामीमध्ये दाखल झाला आहे. शिवाय त्यांनी सराव देखील सुरु केला आहे. विश्वचषक सेमीफायनलमध्ये पराभवानंतर भारताचा हा पहिला द्विपक्षीय दौरा आहे. विश्वचषकमधील पराभवानंतर भारतीय संघात वाद निर्माण झाले असल्याचे वृत्त समोर आले होते. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यात वाद असल्याचे बोलले जात होते. पण विराटने याबाबत स्पष्टीकरण देत या वृत्तांचे खंडन केले. रोहितने देखील अप्रत्यक्षरित्या या प्रकरणाबाबद एक पोस्ट शेअर केली. (IND vs WI: वेस्ट इंडिज टी-20 मालिकेआधी विराट कोहली याची चाहत्यांना Treat, सरावानंतर ऑटोग्राफ देऊन फॅन्सना केले खुश, पहा Video)

दरम्यान, विंडीज दौऱ्यासाठी निघण्याआधी विराटने सोशल मीडियावर एअरपोर्टवरील फोटोज शेअर केले होते. यात कोहलीसह कृणाल पंड्या, खालील अहमद, वॉशिंग्टन सुंदर, मनीष पांडे यासारखे खेळाडू होते पण रोहित मात्र, गैरहजर दिसला. याबाबत चाहत्यांनी त्याला विचारले देखील. आणि आता पुन्हा एकदा विराटने टीम इंडियाच्या सराव सत्रानंतरचा फोटो शेअर केला आहे. विराटने हा फोटो शेअर करताना लिहिले, 'स्क्वाड'. या फोटोत रवींद्र जडेजा, श्रेयस अय्यर, केएल राहुल, भुवनेश्वर कुमार सह अन्य खेळाडू आहेत. पण चाहत्यांना रोहितची अनुपस्थिती विषयी उत्सुकतेणे प्रश्न विचारत आहेत. पहा हे ट्विट्स:

रोहित कुठंय?

रोहित तुझ्या स्क्वाडचा भाग नाही?

भावा रोहित भावाबरोबर देखील पोस्ट कर, असं का वाटत आहे की विश्वचषकनंतर रोहित भाऊ बोलत नाही आहे.

क्रिकेट विश्वचषकमधील भारताच्या पराभवानंतर रोहित आणि विराट यांच्यात वादाला सुरुवात झाली होती. यानंतर रोहितने विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा दिला देखील इंन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याच्या चर्चा प्रसार माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात रंगल्या.