IND vs WI ODI 2022: रोहित शर्माच्या कमबॅकने वाढणार KL Rahul चे टेन्शन, वेस्ट इंडिजविरुद्ध फलंदाजी क्रमवारीत आता ‘या’ क्रमांकावर होऊ शकते घसरण
केएल राहुल आणि रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

IND vs WI ODI 2022: दक्षिण आफ्रिकेकडून लज्जास्पद क्लीन-स्वीपनंतर नियमित कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात टीम इंडिया (Team India) मायदेशात वेस्ट इंडिजशी  (West Indies) दोन हात करणार आहे. 6 फेब्रुवारीपासून दोन्ही संघात वनडे आणि टी-20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. बीसीसीआय (BCCI) निवड समितीने या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. कर्णधार म्हणून रोहित संघात परतला आहे तर उपकर्णधार केएल राहुलला सलामीच्या सामन्यासाठी विश्रांती दिली गेली असून तो दुसऱ्या वनडे सामन्यातून कमबॅक करेल. एकदिवसीय संघात शिखर धवनचा (Shikhar Dhawan) देखील समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता वनडे मालिकेसाठी भारतीय प्लेइंग इलेव्हनच्या लाईन-अपमध्ये राहुलची घसरण होऊ शकते. (IND vs WI Series 2022: ‘कॅप्टन’ रोहित शर्माच्या नेतृत्वात युवा खेळाडूंची टीम इंडियात एन्ट्री, रवी बिश्नोई, Deepak Hooda यांना संधी)

वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिकेसाठी रोहित शर्मा आणि शिखर धवनची जोडी पुन्हा एकदा सलामीला येईल. तर केएल राहुल मधल्या फळीत फलंदाजी क्रमाला मजबूती देईल. टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेतून दमदार पुनरागमन करून वनडे संघात आपली जागा पक्की केली आहे. कर्णधार रोहित देखील आता तंदुरुस्त असून दोघे सलामीला उतरतील. अशा परिस्थितीत आता प्रश्न उपस्थित होत आहे की केएल राहुल कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करेल. राहुलची वनडे संघाचा नवा उपकर्णधार म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे. आणि धवन-शर्माची जोडी सलामीला उतरली तर राहुल पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. शिखर धवन आणि रोहित शर्मानंतर माजी कर्णधार विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर तर, रिषभ पंत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. अशा परिस्थितीत राहुल पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसू शकतो.

राहुलने यापूर्वी देखील पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केली असून त्याने शंभरी धावसंख्या पार केली आहे. याशिवाय विंडीजविरुद्ध राहुल मधल्या फळीत उतरला तर संघाला स्थिरता मिळेल ज्याची दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कमतरता जाणवली. लक्षात घ्यायचे की राहुल पहिल्या वनडे सामन्यासाठी उपल्बध राहणार नसून तो दुसऱ्या सामन्यासाठी निवडीसाठी उपलब्ध असेल. अशा स्थितीत पहिल्या सामन्यासाठी राहूलची उणीव भरून काढण्यासाठी संघात तडाखेबाज फलंदाज आहेत. पण अखेरीस कोणाची प्लेइंग इलेव्हनमध्ये वर्णी लागते हे पाहणे मनोरंजक ठरेल.