IND vs WI ODI 2019: वेस्ट इंडिजमध्ये जे सचिन तेंडुलकर यालाही नाही जमले 'ती' कामगिरी करण्याची टीम इंडिया फलंदाजांना करण्याची संधी, वाचा काय ते
सचिन तेंडुलकर (Photo Credit: Sachin Tenulkar/Instagram)

टी-20 मालिकेत वेस्ट इंडिज (West Indies) संघाचा व्हाईट वॉश केल्यानंतर भारतीय संघ (Indian Team) आता वनडेमध्ये सातत्य राखण्यासाठी सज्ज आहे. भारतीय क्रिकेटपटूंनी विश्वचषकमधील आपला फॉर्म कायम ठेवत टी-20 मालिकेत संतोषजनक खेळी केली आहे. त्यामुळं वनडे मालिकेत देखील टीम इंडियाकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. दरम्यान, वेस्ट इंडिज दौऱ्यादरम्यान टीम इंडियाच्या खेळाडूंना विक्रमी खेळी करण्याची संधी आहे. वनडे मालिकेत भारतीय फलंदाज एका शतकासोबत रेकॉर्ड करू शकतात. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही माजी क्रिकेटपटू आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या नावावर बरेच विश्वविक्रम आहेत, जे खेळाडूंना मोडून काढण्यासाठी अनेक दशके लागतील. (IND vs WI 3rd T20I मॅचमध्ये एमएस धोनी याचा रेकॉर्ड मोडत रिषभ पंत याने रचला नवीन इतिहास, जाणून घ्या सविस्तर)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके ठोकण्याचा विश्वविक्रम तेंडुलकरच्या नावावर आहे. पण असा एक देश असा आहे की जेथे तेंडुलकर वनडेमध्ये शतक ठोकू शकला नाही. आणि तो म्हणजे वेस्ट इंडिज. वनडेमध्ये 49 शतक ठोकणाऱ्या सचिनला विंडीजमध्ये वनडे क्रिकेटमध्ये एकही शतक करता आले नाही. इतकेच नाही तर टेस्ट क्रिकेटमध्येही तेंडुलकरने कॅरेबियन भूमीवर केवळ एक शतक ठोकण्याचा विक्रम केला आहे. वेस्ट इंडिजच्या भूमीवर टेस्ट क्रिकेटमध्ये शतक झळकावण्यासाठी सचिनने अनेक संधी गमावल्या आहेत.

वेस्ट इंडिजमध्ये तेंडुलकरने 6 वनडे सामने खेळले आहेत. या सामन्यांपैकी 4 सामन्यांमध्ये तेंडुलकर सलामीला खेळाला, तर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने दोन सामने खेळले आहेत. त्यामुळे वनडेमध्ये एक शतक झळकावत विंडीजमध्ये शतक झळकावणारा पहिल्या भारतीय फलंदाज बनण्याची संधी आहे.