भारत (India) विरुद्ध वेस्ट इंडीज (West Indies) संघातील टी-20 मालिकेच्या तिसर्या सामन्यात टीम इंडियाचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याने शानदार फलंदाजी केली. पहिल्या दोन सामन्यात पंतला साजेशी फलंदाजी करता आली नव्हती, पण तिसर्या सामन्यात त्याने सर्व कसर भरून काढली आणि संघाला विजय मिळवून देण्यासाठी अर्धशतकांची नाबाद खेळी साकारली. वेस्ट इंडिजविरुद्ध या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. आणि विंडीजविरुद्ध क्लीन स्वीप करत विजयी सलामी दिली. या सामन्यात पंत आता आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट सामन्यात विकेटकीपर-फलंदाज म्हणून भारताकडून सर्वाधिक धावा करणारा विकेटकीपर-फलंदाज बनला आहे. पंतच्या आधी ही कामगिरी महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्या नावावर होती. (IND vs WI 3rd T20I: टीम इंडियाकडून वेस्ट इंडिजचा 3-0 ने क्लीन स्वीप; अंतिम टी-20 मध्ये 7 विकेट्सने केला पराभव)
वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या आणि अंतिम टी-20 सामन्यात दोन्ही सलामीवीर संतोषजनक खेळी करण्यात अयशस्वी राहिले. त्यानंतर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने पंतच्या साथीने भारताचा डाव सावरला आणि संघाचा विजय निश्चित केला. विराटने 59 धावा केल्या तर पंतने 65 धावा केल्या. याचबरोबर पंतने धोनीचा एक विक्रम मोडला आहे. धोनीने 2017 मध्ये इंग्लंडविरुद्ध बंगळुरुमध्ये टी-20 संयत यष्टिरक्षक म्हणून 56 धावा केल्या होत्या. आता रिषभने धोनीला मागे सोडले आहे. रिषभने वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद 65 धावा करून धोनीला मागे सोडले आणि हा नवीन विक्रम आपल्या नावावर केला.
भारताच्या विकेटकीपर (टी-20I) कडून सर्वाधिक स्कोअर
-65 नाबाद रिषभ पंत विरुद्ध वेस्ट इंडिज, प्रोविडेंस 2019
-56 एमएस धोनी विरुद्ध इंग्लंड, बेंगळुरू 2017
-52 नाबाद एमएस धोनी विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सेंच्युरियन 2018
वेस्ट इंडिजविरुद्धच्या या सामन्यात पणने 42 चेंडूत नाबाद 65 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत चार चौकार आणि चार षटकार लगावले. ही त्याच्या टी -20 कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी होती. या सामन्यात पंतचा स्ट्राईक रेट 154.76 इतका होता. यापूर्वी, टी-20 सामन्यात त्याची सर्वोत्तम धावसंख्या 58 धावांची होती, जी त्याने 11 नोव्हेंबर 2018 रोजी चेन्नई येथे वेस्ट इंडिजविरुद्ध केली होती.