IND vs WI 3rd T20I: कोलकाताच्या ईडन गार्डन्स (Eden Gardens) येथे वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) तिसऱ्या टी-20 सामन्यात सूर्यकुमार यादव आणि वेंकटेश अय्यर यांची दमदार फलंदाजांची झलक पाहायला मिळाली. कॅरेबियन संघाला सामन्यात विजय आणि क्लीन स्वीप टाळण्यासाठी 185 धावांचे लक्ष्य मिळाले पण पुन्हा एकदा या संघाची सुरुवात खराब झाली आणि त्यांनी पॉवरप्ले मध्येच दोन्ही सलामी फलंदाजांच्या विकेट गमावल्या. मात्र, भारतीय संघ गोलंदाजी करायला उतरला तेव्हा पहिल्याच षटकात DRS चा ड्रामा देखील पाहायला मिळाला. तर असे घडले की, दीपक चाहर (Deepak Chahar) याच्या पहिल्याच षटकात मैदानावरील पंचाने काइल मेयर्सला पायचीत आऊट दिले पण मेयर्सने लगेच रिव्ह्यू घेतला आणि चेंडू स्टंपवरून जात असल्याने तो वाचला. (IND vs WI 3rd T20I: सूर्यकुमार यादवचे दमदार अर्धशतक, Venkatesh Iyer याची तडाखेबाज फलंदाजी; वेस्ट इंडीजसमोर 185 धावांचे लक्ष्य)
यानंतर ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर मेयर्सच्या बॅटच्या कड्याला लागला आणि ईशान किशनने सोपा झेल घेतला पण अंपायरने आऊट दिला नाही. मात्र यावेळी रोहित शर्माने (Rohit Sharma) एकही सेकंद न गमावता रिव्ह्यू घेतला. मग रोहित रिव्ह्यू घेणार आणि तो चुकीचा ठरणार? असे क्वचितच पाहायला मिळते. अंपायरला आपला निर्णय बदलावा लागला आणि मेयर्सला पॅव्हिलियनमध्ये पाठवले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
RRS @ImRo45 😍❤
Amazing review style 😀😀pic.twitter.com/z9pusQ2VWx
— 🅆🄷🄸🅃🄴 🅃🄸🄶🄴🅁 👉#MI (@SidharthshuklaC) February 20, 2022
यादरम्यान सोशल मीडियावर नेटकरी देखील रोहित शर्माच्या अचूक DRS निर्णयावर फिदा झाले आहेत.
कर्णधार रोहित आणि डीआरएस
Captain Rohit & DRS what a beautiful story 🤝#RohitSharma | #INDvSL | #INDvWI
— Rohit Sharma Fanclub India (@Imro_fanclub) February 20, 2022
निर्णय रोहित प्रणाली
Decision Rohit System DRS 😍@ImRo45 #RohithSharma #INDvsWI pic.twitter.com/5Ci8elChSu
— R∆JE$H (@SOseetarama) February 20, 2022
रोहित शर्मा DRS सह परतला!
Rohit sharma is back with his review system - DRS - Decision by Rohit Sharma and Windies goes one down... Captain Rohit sharma never disappoints...
— Johns. (@CricCrazyJ0hns) February 20, 2022
निश्चितपणे रोहित सिस्टम - डीआरएस
Definitely Rohit System - DRS 🔥
Once again @ImRo45 .....!🇮🇳 pic.twitter.com/jj8T6bAlRD
— MI Fans Army™ (@MIFansArmy) February 20, 2022
डायनॅमिक रोहित शर्मा
DRS - Dynamic Rohit Sharma@coolfunnytshirt #RohithSharma #INDvsWI pic.twitter.com/Xnp99DVMdd
— Pratik SATISH (@Tweeterati_hoon) February 20, 2022
सामन्याबद्दल बोलायचे तर सलग दुसऱ्या सामन्यात टॉस गमावून प्रथम फलंदाजी करत सूर्यकुमार यादव याच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 184 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून सूर्यकुमारने 31 चेंडूत 65 धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात खराब झाली. झटपट सुरुवात करूनही ईशान किशन 31 चेंडूत 34 धावाच करू शकला. तर कर्णधार रोहित 7 धावा करून माघारी परतला. तथापि वेंकटेश अय्यरने पुन्हा एकदा आक्रमक फलंदाजी करून 19 चेंडूत नाबाद 35 धावांची खेळी केली.