टीम इंडियाचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आयपीएल 2022 पासून (IPL 2022) अष्टपैलू हार्दिक पांड्याची विक्रमी कामगिरी कायम आहे. हार्दिक पंड्याने मंगळवारी (2 ऑगस्ट) सेंट किट्समधील वॉर्नर पार्क येथे विंडीजविरुद्ध (IND vs WI) खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यातही मोठा विक्रम केला. या सामन्यात त्याने असा पराक्रम केला जो यापूर्वी कोणताही भारतीय खेळाडू करू शकला नव्हता. हार्दिक पांड्याने वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात 4 षटके टाकली, 4.75 च्या इकॉनॉमीमध्ये फक्त 19 धावा दिल्या आणि 1 बळी घेतला. ही विकेट मिळताच हार्दिक पांड्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 बळी पूर्ण केले आणि सर्वोत्कृष्ट विक्रमही आपल्या नावावर केला. T20 क्रिकेटमध्ये 500 हून अधिक धावा आणि 50 बळी घेणारा हार्दिक पांड्या हा भारतातील पहिला खेळाडू ठरला आहे. ही खास कामगिरी करणारा हार्दिक हा जगातील 9वा खेळाडू आहे.
T20 मध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स
हार्दिक पांड्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी 50 बळी घेणारा 6वा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी ही कामगिरी केली आहे. दुसरीकडे, जर आपण भारतासाठी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बद्दल बोललो तर तो आहे युजवेंद्र चहल. युजवेंद्र चहलने भारताकडून 60 टी-20 सामन्यात 79 विकेट घेतल्या आहेत. (हे देखील वाचा: IND vs WI: रोहित शर्माचा लज्जास्पद विक्रम, टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा शुन्यावर बाद होणारा खेळाडू बनला)
पंड्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट
हार्दिक पांड्या टी-20 वर्ल्ड कप 2021 पासून टीम इंडियातून बाहेर पडला होता, पण तो पुन्हा एकदा टीम इंडियाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. हार्दिक पांड्याने आतापर्यंत भारतासाठी 66 टी-20 सामन्यांमध्ये 23.03 च्या सरासरीने 806 धावा केल्या आहेत आणि 50 बळी घेतले आहेत. हार्दिक पांड्याने 66 एकदिवसीय सामने देखील खेळले आहेत ज्यात त्याने 1386 धावा आणि 63 विकेट घेतल्या आहेत. पंड्याने 11 कसोटी सामन्यांमध्ये 532 धावा आणि 17 विकेट्स घेतल्या आहेत.