IND vs WI 3rd ODI: कटक वनडे मॅचमधून दीपक चाहर आऊट, नवदीप सैनी याचा टीम इंडियात समावेश
नवदीप सैनी आणि दीपक चाहर (Photo Credit: IANS)

बाराबती स्टेडियमवर (Barabati Stadium) वेस्ट इंडीज (West Indies) विरुद्ध तिसर्‍या आणि निर्णायक वनडे सामन्यात भारतीय क्रिकेट संघाच्या संघात नवदीप सैनी (Navdeep Saini) याला दीपक चाहर (Deepak Chahar) याच्या जागी स्थान देण्यात आले आहे. “बुधवारी विझागमध्ये खेळल्या गेलेल्या दुसर्‍या वनडे सामन्यानंतर दीपकला त्याच्या पाठीच्या खालच्या भागात हळू वेदना झाल्याची बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या निवेदनाद्वारे दिली. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्यांची तपासणी केली आणि वेगवान गोलंदाजाला पूर्णपणे बरे होण्यासाठी थोडा विश्रांती घ्यावी लागणार असल्याचे सुचवले आहे. अशाप्रकारे त्याला अंतिम वनडे सामन्यातून बाहेर काढले गेले आहे." चेन्नईत भारताने पहिला वनडे सामना आठ विकेट्सने गमावला, पण रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्या शतकी खेळीमुळे भारताने दमदार शैलीत पुनरागमन केले आणि विजागमध्ये 107 धावांनी विजय मिळवून मालिकेट बरोबरी केली. (IND vs WI 2nd ODI: किरोन पोलार्ड, विराट कोहली यांचा 'गोल्डन डक'; रोहित शर्मा याची दमदार खेळी; विशाखापट्टणम स्टेडियममध्ये रचले गेले अनेक विक्रम)

दीपकच्या जागी वेगवान गोलंदाज सैनीला संघात स्थान मिळालं आहे. आयपीएलमध्ये आणि देशांतर्गत स्तरावर शानदार कामगिरी करून टीम इंडियामध्ये स्थान मिळवणाऱ्या सैनीचा पुन्हा विराट कोहलीच्या टीम इंडियामध्ये पुन्हा समावेश झाला आहे. कटकच्या बाराबती स्टेडियमवर होणार्‍या मालिकेच्या अंतिम सामन्यापूर्वी सैनी भारतीय संघात सामील होईल. दीपक भारतीय संघातील तिसरा खेळाडू आहे ज्याने दुखापत झाली आहे. यापूर्वी, शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) यांनाही दुखापत झाल्याचे सामोर आले. भुविचा विंडीजविरुद्ध टी-20 मालिकेटसाठी भारतीय संघात समावेश झाला होता, पण त्याची दुखापत पूर्ण बारी न झाल्याने त्याला वनडे मालिकेला मुकावे लागले होते. दुसरीकडे, धवनला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या एका मॅचदरम्यान गुडघ्याला दुखापत झाली होती.

तिसऱ्या वनडे सामन्यासाठी भारताची संघ: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा उपकर्णधार), मयंक अग्रवाल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, केदार जाधव, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव , मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर आणि नवदीप सैनी.