IND vs WI 3rd ODI Live Streaming: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिल्या टी-20 सामन्याचे लाइव्ह ब्रॉडकास्ट आणि ऑनलाईन स्ट्रीमिंग कुठे व कसे पाहणार?
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज 1st T20 लाइव्ह स्ट्रीमिंग (Photo Credit: Twitter, PTI)

IND vs WI 3rd ODI Live Streaming: भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यात बुधवारी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर (Eden Gardens) तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिला सामना खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने (Team India) यापूर्वी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत वेस्ट इंडिजचा 3-0 असा क्लीन स्वीप केला होता. अशा परिस्थितीत रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वातील भारतीय संघ (Indian Team) पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात विजयाची गती कायम ठेवण्यासाठी इच्छूक असेल. दुसरीकडे, किरोन पोलार्डच्या (Kieron Pollard) नेतृत्वातील विंडीज संघ सध्याच्या दौऱ्यात पहिला विजय मिळवण्याच्या निर्धारित असेल. विंडीज संघ टी-20 क्रिकेटमध्ये मजबूत आहे, त्यामुळे इथे त्यांना भारतावर वर्चस्व राखायला नक्कीच आवडेल. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला टी-20 सामना लाइव्ह कुठे आणि कसा पाहणार याची सर्व माहिती खालीलप्रमाणे आहे. (IND vs WI T20I Series 2022: विराट कोहली -रोहित शर्मा बनू शकतात टी-20 चे बादशाह, विंडीजविरुद्ध भारतीय फलंदाजांच्या निशाण्यावर असेल ‘हा’ मोठा रेकॉर्ड)

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना शुक्रवार, 16 फेब्रुवारी रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळला जाणार आहे. भारतीय चाहते स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 HD, स्टार स्पोर्ट्स 2, स्टार स्पोर्ट्स 2 HD आणि स्टार स्पोर्ट्स 3 वर सामन्याचे लाइव्ह टेलिकास्ट पाहू शकतात. तर Disney + Hotstar अ‍ॅपवर पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याचे लाइव्ह स्ट्रिमिंग उपलब्ध असेल. दरम्यान, दोन संघांमधील टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची आकडेवारी पाहिली तर येथे भारतीय संघाचा वरचष्मा आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत 17 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने 10 सामने तर कॅरेबियन संघाने 6 सामने जिंकले आहेत.

भारत आणि वेस्ट इंडिज टी-20 संघ खालीलप्रमाणे आहेत.

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), आहण किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, व्यंकटेश अय्यर, दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, रुतुराज गायकवाड, दीपक हुडा, कुलदीप यादव आणि हरप्रीत ब्रार.

वेस्ट इंडिज: किरोन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन, फॅबियन अ‍ॅलन, डॅरेन ब्रावो, रोस्टन चेस, शेल्डन कॉट्रेल, डॉमिनिक ड्रेक्स, जेसन होल्डर, शाई होप, अकील होसेन, ब्रँडन किंग, रोवमन पॉवेल, रोमारियो शेफर्ड, ओडेन स्मिथ, काइल मेयर्स आणि हेडन वॉल्श जूनियर.