टीम इंडिया (Photo Credit: AP/PTI)

वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध सबिना पार्क येथे केलेल्या जाणाऱ्या दुसऱ्या आणि अंतिम टेस्ट सामन्यात भारताने (India) धावांनी विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने विंडीजविरुद्ध टी-20 आणि वनडे मालिकेनंतर टेस्टमध्ये देखील क्लीन-स्वीप पूर्ण केला आहे. दुसऱ्या डावांत भारताने दिलेल्या 468 धावांचा पाठलाग करत विंडीजला 210 धावाच करता आल्या आणि खेळ चौथ्या दिवशीच संपुष्टात आला. आजचा विजय भारताचा विंडीजविरुद्ध आठवा विजय होता. विंडीजच्या दुसऱ्या डावात भारतासाठी रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja), मोहम्मद शमी (Mohammed Shami) यांनी 3 गडी बाद केले तर इशांत शर्मा (Ishant Sharma0 याला 2 विकेट्स मिळाल्या. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याला 1 विकेट घेता आली. (एकाच सामन्यात जसप्रीत बुमरहा, इशांत शर्मा , रिषभ पंत यांची विक्रमाला गवसणी)

संपूर्ण टेस्ट सिरीजमध्ये भारतासाठी गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. बुमराह आणि इशांतने मुख्यतः प्रभावी खेळी केली. दरम्यान, या विजयासह टीम इंडिया आयसीसी (ICC) टेस्ट चॅम्पिअनशिपच्या गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर पोहचली आहे. विंडीजविरुद्ध टेस्ट मालिका जिंकत भारताकडे 120 पॉईंट्स झाले आहेत. पहिल्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडीज संघाला भारताचा वेगवान गोलंदाज बुमराहने हादरवून टाकले. कोणताही फलंदाज त्याच्यासमोर आत्मविश्वासाने फलंदाजी करू शकला नाही. भारताच्या वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात आत्तापर्यंत बुमराहने 6 विकेट्स घेतल्या आहेत. तत्पूर्वी, भारताने पहिल्या डावात हनुमा विहारी (Hanuma Vihar) 111, विराट कोहलीच्या 76, इशांत शर्माच्या 57 आणि मयांक अग्रवालच्या 55 धावांच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या डावात 416 धावा केल्या. विहारीने टेस्ट करिअरमधील आपले पहिले शतक ठोकले.

फलंदाजीमध्ये भारतासाठी अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि विहारी यांनी प्रभाव पडला. पहिल्या डावात विहारीने टेस्ट करिअरमधील पहिले शतक केले तर दुसऱ्या डावात अर्धशतक केले आणि भारताला मोठा स्कोर उभा करण्यास महत्वाचे योगदान दिले. पहिल्या डावात भारताने 416 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव 117 धावांवर संपुष्टात आला. टीम इंडियाने वेस्ट इंडिजला फॉलोऑन न देण्याचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या डावात फलंदाजी करत चार बाद 168 धावांवर डाव घोषित केला.