IND vs WI 2nd Test Day 3: दुसऱ्या डावात हनुमा विहारी याने केली सचिन तेंडुलकर याची बरोबरी, 29 वर्षानंतर केली मास्टर-ब्लास्टरच्या या खेळीची पुनरावृत्ती
हनुमा विहारी आणि सचिन तेंडुलकर (Photo Credit: Getty)

इन-फॉर्म हनुमा विहारी (Hanuma Vihari) आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांच्यातील दुसर्‍या कसोटीच्या दुसर्‍या डावात 111 धावांची नाबाद भागीदारीमुळे भारतीय संघाने (Indian Team) वेस्ट इंडिजचा (West Indies) क्लीन स्वीपच्या उंबरठ्यावर पोहचला आहे. तीन दिवसांच्या खेळानंतर वेस्ट इंडिजला विजयासाठी 468 धावांचे लक्ष्य आहे. त्याच्या प्रत्युत्तरात विंडीजने 45 धावांवर दोन विकेट गमावले. आता चौथ्या दिवशी भारताने लक्ष्य विंडीजचा क्लीन-स्वीप करण्याचे असेल. सबिना पार्क येथे खेळल्या जाणार्‍या दुसर्‍या सामन्यात विहारीने पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले. यासह, विहारीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या पराक्रमाची पुनरावृत्ती 29 वर्षांनंतर केली. विहारीने दुसर्‍या कसोटीत शानदार डाव खेळला आणि सचिन तेंडुलकरसमवेत या एलिट क्लबमध्ये सामील झाला. (एकाच सामन्यात जसप्रीत बुमरहा, इशांत शर्मा , रिषभ पंत यांची विक्रमाला गवसणी)

वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या डावात विहारीने 111 धावा केल्या तर दुसर्‍या डावात नाबाद 53 धावा केल्या. या शानदार खेळीमुळे विहारीने आशियाबाहेर सहाव्या किंवा त्याच्या खाली फलंदाजी करताना 'हा' विक्रम करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे. एकाच कसोटी सामन्यात शतक आणि अर्धशतक झळकावणारा सचिननंतर तो भारताचा दुसरा फलंदाज ठरला आहे. या यादीमध्ये सचिन तेंडुलकर, मन्सूर अली खान पतौडी, एमएल जयसिंहा आणि पाउली उमरीगर यांच्यासारख्या दिग्गज फलंदाजांचा समावेश आहे. सचिनने हा पराक्रम इंग्लंडविरुद्ध मँचेस्टरमध्ये साधला.

याआधी पहिल्या डावात शतक करत विहारीने त्याच्या दिवंगत वडिलांना समर्पित केले. दुसर्‍या  सामन्याच्या पहिल्या डावात शतक झळकावल्यानंतर हनुमाने सांगितले की, "वयाच्या 12 व्या वर्षी वडिलांच्या निधनानंतर त्याने क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला होता. हनुमाने आपले पहिले कसोटी शतक वडिलांना समर्पित करताना सांगितले की ते जिथेही आहे तिथे या क्षणी त्यांना त्याचा अभिमान वाटत असेल.