IND vs WI 2nd Test Day 1: मयंक अग्रवाल, विराट कोहली यांच्या अर्धशतकाने भारताला सावरले; पहिल्या दिवसाखेर टीम इंडियाचा स्कोर 5 बाद 264 धावा
मयांक अग्रवाल (Photo Credits: Getty Images)

जमैकाच्या सबिना पार्क मैदानावर वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध दुसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने पहिल्या डावात 5 बाद 264 धावा केल्या होत्या. टॉस गमावून पहिले फलंदाजी करायला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात धीमी झाली. 32 धावांवर भारताने पहिले विकेट गमावले. केएल राहुल (KL Rahul) याने 13 धावा केल्या आणि दुसर्‍या स्लिपमध्ये जेसन होल्डर याने रहकीम कॉर्नवॉल याच्याकडे झेलबाद केले. यानंतर फलंदाजीसाठी बाहेर पडलेला चेतेश्वर पुजारा अवघ्या 6 धावा काढून कॉर्नवॉलच्या चेंडूवर बाद झाला. त्यानंतर, कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि मयंक अग्रवाल (Mayank Agrwal) याने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान, मयंकने त्याचे अर्धशतक पूर्ण केले. पण, नंतर तो विराटला जास्त साथ देऊ शकला नाही आणि 55 धावा करत माघारी परतला. (IND vs WI 2019: टीम इंडिया-भारतीय उच्चयुक्त भेटीदरम्यान अनुष्का शर्मा हिच्याकडून ग्रुप फोटो 'नको रे बाबा')

विराट आणि मयंकच्या भागीदारीच्या जोरावर भारताला 112 धावांपर्यंत मजल मारता आली. मयंक आणि विराटने तिसर्‍या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी केली. जेव्हा भारताची धावसंख्या 115 होती तेव्हा मयंकने 55 धावा केल्या होत्या आणि होल्डरने त्याला कॉर्नवॉलकडे दुसर्‍या स्लिपवर झेलबाद केले. चौथी विकेट म्हणून अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 24 धावांवर बाद झाला. जेव्हा भारताची धावसंख्या 164 धावा होती तेव्हा रहाणेने किमर रोच (Kemar Roach) याने जाहमार हॅमिल्टन यांच्याकडे त्याला झेलबाद केले. यानंतर हनुमा विहारी (Hanuma Vihar) याच्यासह कोहलीने भारताची धावसंख्या 202 पर्यंत वाढवली. 76 धावा काढून विराट होल्डरचा बळी ठरला.

यानंतर रिषभ पंत (Rishabh Pant) आणि विहारी यांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताला आणखी धक्का बसू दिला नाही. आतापर्यंत सहाव्या विकेटसाठी दोघांनी 62 धावांची भागीदारी केली आहे. पहिला दिवस संपला तेव्हा विहारी 42 तर पंत 27 धावांवर खेळात होते.  वेस्ट इंडिजकडून होल्डरने 3, रोच आणि कॉर्नवॉलने प्रत्येकी 1-1 विकेट्स घेतले आहेत.