भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) मधील दुसऱ्या वनडे सामन्यात पावसामुळे दोनदा व्यत्यय आला. आणि आता डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे वेस्ट इंडिजला विजयासाठी 46 ओव्हरमध्ये 270 धावांची गरज आहे. आजचा सामना जिंकत दोन्हीपैकी एक संघ मालिके 1-0 अशी आघाडी मिळवू शकतो. पहिला वनडे सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे दोन्ही संघासाठी आजचा सामना महत्वाचा आहे. विंडीजची सुरुवात मंद झाली. एकीकडे एव्हिन लुईस (Evin Lewis) मोठे शॉट्स खेळत होता तर क्रिस गेल (Chris Gayle) संघर्ष करताना दिसला. पहिल्या वनडेप्रमाणे यंदाच्या सामन्यात देखील गेल प्रभावी खेळी करू शकला नाही आणि केवळ 1 धावा करत बाद झाला. यादरम्यान, त्याने विंडीजचा महान फलंदाज ब्रायन लारा (Brian Lara) याला मागे टाकत देशासाठी वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम स्थापित केला. (IND vs WI 2nd ODI: विराट कोहलीचा सौरव गांगुलीला दे धक्का, एकाच सामन्यात स्थापित केले अनेक रेकॉर्ड)
आजच्या या सामन्यात कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) च्या जबरदस्त खेळी करत आपले 42 वे शतक पूर्ण केले. अखेर 42व्या ओव्हरमध्ये 125 चेंडूत 120 धावा करत विराट बाद झाला. विश्वचषकमध्ये विराटला एकही शतक करता आले नव्हेत. त्यामुळे, तब्बल दोन महिन्यानंतर विराटने शतकी कामगिरी केली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) स्वस्तात बाद झाल्यावर त्याला पाचव्या क्रमांकावर आलेल्या श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने अर्धशतकी खेळी करत विराटला चांगली साथ दिली. विराट आणि अय्यरने 125 धावांची भागीदारी केली आणि संघाला मोठी धाव संख्या उभारण्यास मोठे योगदान दिले. वेस्ट इंडिजसाठी कार्लोस ब्राथवेट याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याने कोहली आणि पंतला माघारी धाडले. शेल्डन कॉटरेल, रोस्टन चेस आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
सामन्यात भारताने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, सलामीच्या फलंदाजांना चांगली खेळी करता आली नाही. दुखापतीतून पुनरागमन केलेल्या शिखर धवन याला केवळ 2 धावा करता आल्या. पहिल्याच ओव्हरमध्ये शेल्डन कॉटलर याने शिखरला बाद केले. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या विराटने 14व्या ओव्हरमध्ये आक्रमक फलंदाजी करत आपलं अर्धशतकी खेळी पूर्ण केली. त्यानंतर विराट आणि रोहितने 74 धावांची भागिदारी केली आणि संघाचा डाव सावरला. मात्र रोहितला 34 चेंडूत फक्त 18 धावा करता आल्या. दुसरीकडे, चौथ्या क्रमांकावर आलेला रिषभ पंत यानेदेखील निराशा केली आणि 20 धावा करत बाद झाला.