IND vs WI 2nd ODI: विराट कोहलीचा सौरव गांगुलीला दे धक्का, एकाच सामन्यात स्थापित केले अनेक रेकॉर्ड
विराट कोहली (Image: PTI/File)

भारत (India)-वेस्ट इंडिज (West Indies) मधील दुसरा वनडे सामना भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्यासाठी रेकॉर्ड खेळी करण्याचा दिवस होता. आजच्या विंडीजविरुद्ध सामन्यात विराटने एक नाही तर तीन रेकॉर्ड मोडत नवीन केली आहे. एकीकडे विराटने माजी पाकिस्तानी कर्णधार जावेद मियाँदाद (Javed Miandad) यांचा 26 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला आणि विंडीजविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक धावा केल्या. विंडीजविरुद्ध कोहलीने जबरदस्त खेळी करत आपले 42वे शतक पूर्ण केले. अखेर 42व्या ओव्हरमध्ये 125 चेंडूत 120 धावा करत विराट बाद झाला. (IND vs WI 2nd ODI: सचिन तेंडुलकर-वीरेंद्र सेहवाग या जोडीला मागे टाकत विराट कोहली-रोहित शर्मा यांची विक्रमी भागीदारी)

आजच्या सामन्यात विराटने अजून एक कीर्तिमान आपल्या नावावर केला आहे. कोहलीने या सामन्यात तुफानी खेळी करत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) याला पिछाडीवर टाकले आहे. विंडीजविरुद्ध दुसऱ्या सामन्यात दमदार खेळी करत कोहलीने गांगुलीला सर्वाधिक धावांच्या यादीत पिछाडीवर टाकले आहे. गांगुलीने 311 वनडे मॅचमध्ये 11,363 धावा होत्या. या धावांचा टप्पा कोहलीने आजच्या खेळीमध्ये ओलांडला आहेत. आता कोहलीच्या वनडेमध्ये 11406 धावा आहेत. दरम्यान, वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या नावावर आहे. सचिनच्या नावावावर 18, 426 धावा आहेत.

दरम्यान, आजच्या सामन्यात टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्या रुपात पहिला धक्का बसला. धवन आऊट झाल्यावर कोहली फलंदाजीला आला आणि आपल्या आक्रमक शैलीत त्याने फटकेबाजी करायला सुरुवात केली. ही फटकेबाजी करताना कोहलीने या सामन्यात 19 धावा जेवहा केल्या, तेव्हा तो विंडीजविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा अव्वल फलंदाज बनला. कोहलीने यावेळी मियाँदाद यांना पिछाडीवर सोडले. मियाँदाद यांच्या नावावर 1930 धावा होत्या. या धावा त्यांनी 64 डावांमध्ये केल्या होत्या. कोहलीने मात्र हा धावांचा विक्रम मोडीत काढताना मियाँदाद यांच्यापेक्षी 34 डाव कमी खेळला आहे.