(Image Credit: AP/PTI Photo)

भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) संघात आज दुसरा वनडे सामना पोर्ट ऑफ स्पेन मैदानात खेळला जात आहे. भारताने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण सुरुवातीलाच भारताला मोठा धक्का बसला. सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) 2 धावा करत स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या साथीने सावध खेळी करत भारताचा डाव सावरला. आजच्या विराट आणि रोहितने 74 धावांची भागिदारी केली. रोहित जास्त काळ विराटला साथ देऊ शकला नाही आणि 34 चेंडूत फक्त 18 धावा करत बाद झाला. (IND vs WI 2nd ODI: विराट कोहली याची शतकी खेळी, वेस्ट इंडिजविरुद्ध पूर्ण केल्या 2000 धावा)

दरम्यान, आजच्या विंडीज विरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित-विराटच्या जोडीने एक अनोख्या विक्रमाची नोंद केली. दुसर्‍या वनडे सामन्यात त्यांनी 50 धावांची भागीदारी करत माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यांच्या जोडीला मागे टाकत वनडे क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक पन्नास धावांच्या भागीदारीची नोंद केली आहे. कोहली-रोहितच्या 32 वेळा पन्नास धावांची भागीदारी केली आहे. दुसरीकडे, सचिन आणि सेहवागच्या जोडीने 31 वेळा पन्नास धावांची भागीदारी केली आहेत.

भारतासाठी वनडे सामन्यात सर्वाधिक 50 पेक्षा अधिक धावांची भागीदारी:

55- सौरव गांगुली-सचिन तेंडुलकर

32- रोहित शर्मा-विराट कोहली

31- सचिन तेंडुलकर-वीरेंद्र सेहवाग

29- रोहित शर्मा-शिखर धवन

या यादीत पहिल्या क्रमांकावर सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि सचिन तेंडुलकर यांची महान जोडी आहे. या दोघांनी 55वेळा पन्नासहून अधिक धावा केल्या आहेत. दरम्यान, रोहित-विराटने धवन आणि रोहितच्या जोडीलाही मागे टाकले आहे. शिखर आणि रोहित यांनी मिळून 29 वेळा पन्नासहुन अधिक धावांची भागीदारी करत 4728 धावा केल्या आहेत. टीम इंडियासाठी वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावांची भागिदारी करण्याचा विक्रमही गांगुली आणि तेंडुलकरच्या जोडीच्या नावावर आहे.