IND vs WI 2nd ODI: विराट कोहली याची शतकी खेळी, वेस्ट इंडिजविरुद्ध पूर्ण केल्या 2000 धावा
विराट कोहली (Image Credit: AP/PTI Photo)

भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) संघात आज दुसरा वनडे सामना पोर्ट ऑफ स्पेन मैदानात खेळला जात आहे. भारताने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण सुरुवातीलाच भारताला मोठा धक्का बसला. सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) 2 धावा करत स्वस्तात माघारी परतला. शेल्डन कॉटलर याने धवनला बाद केले.  त्यानंतर फलंदाजीला आलेल्या कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या साथीने सावध खेळी करत भारताचा डाव सावरला. विराट आणि रोहितने 74 धावांची भागिदारी केली. पण,

रोहितला 34 चेंडूत फक्त 18 धावा करता आल्या. आजच्या सामन्यात विराटने विंडीजविरुद्ध वनडेमध्ये 2000 धावा केल्या आहेत. विराटने 24 डावात ही खेळी केली आहेत. विश्वचषकमध्ये विराटला एकदाही शतक करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे आजचे हे शतक विराट आणि त्याच्या  आहे. (IND vs WI 2nd ODI: वेस्ट इंडिजविरुद्ध विराट कोहली याने मोडला पाकिस्तानी जावेद मियाँदाद यांचा 26 वर्ष जुना रेकॉर्ड, केल्या इतक्या धावा)

दरम्यान, विंडीज विरुद्ध आजचा दुसऱ्या वनडे सामना जिंकत भारत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवू शकतो. त्यामुळे टीम इंडियासाठी आजचा हा सामना महत्वाचा आहे. दुसरीकडे, या सामन्यात रोहित शर्मा-विराटच्या जोडीने एक अनोख्या विक्रमाची नोंद केली. दुसर्‍या वनडे सामन्यात त्यांनी 50 धावांची भागीदारी त्यांनी वनडेमध्ये 32 वेळा 50 पेक्षा अधिक धावांच्या भागीदारी केली आहे. याचबरोबर त्यांनी रोहित आणि शिखरच्या जोडीला मागे टाकले आहे.

दुसरीकडे, आजच्या वेस्ट इंडिजविरुद्ध फलंदाजी करताना 20 धावा करत विराटने पाकिस्तानचा दिग्गज फलंदाजाचा माजी कर्णधार जावेद मियाँदाद यांचा विक्रम मोडला. मियाँदाद यांनी विंडीजविरुद्ध 64 डावात 1930 धावा केल्या होत्या. विराटने केवळ 19 धावा करत 34 डावांमध्ये मियॉंदाद यांचा हा विक्रम मोडला. विराटच्या या खेळीत सात शतकं आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे.