टीम इंडिया (Photo Credit: Twitter/BCCI)

टीम इंडियाविरुद्ध विशाखापट्टणम स्टेडियममध्ये सुरु असलेल्या मॅचमध्ये विंडीज संघाचा 107 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. भारताने (India) दिलेल्या 388 लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजला (West Indies) 280 धावाच करता आल्या. या सामन्यात विजय मिळवत भारतीय संघाने (Indian Team) 3 सामन्यांच्या मालिकेत विंडीजसह 1-1 ने बरोबरी केली आहे. यापूर्वी चेन्नईमध्ये झालेल्या मॅचमध्ये विंडीजने 8 विकेटने विजय मिळवला होता. आता दोंघांमधील अंतिम आणि निर्णायक सामना 22 डिसेंबर, रविवारी कटक स्टेडियममध्ये खेळला जाईल. टीम इंडियाकडून कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि मोहम्मद शमी यांनी 3, रवींद्र जडेजा याने 2 आणि शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) याने 1 गडी बाद केला. कुलदीपने भारताकडून हॅटट्रिक घेतली आहे. 33 व्या षटकात त्याने शाई होप, जेसन होल्डर आणि अलझारी जोसेफ यानं सलग तीन चेंडूंत पॅव्हिलिअनचा मार्ग दाखवला. वनडेमधील ही त्याची दुसरी हॅटट्रिक आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन हॅटट्रिक घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज आणि जगातील दुसरा फिरकीपटू ठरला. (IND vs WI 2nd ODI: कुलदीप यादव याने घेतली हॅटट्रिक, दोन हॅटट्रिक घेणारा ठरला पहिला भारतीय )

विंडीजकडून होपने सर्वाधिक 78 आणि निकोलस पूरन याने 75 धावांची खेळी केली. एव्हिन लुईस याने 30 धावांचे योगदान दिले. वेस्ट इंडीजविरुद्ध भारताने 50 षटकांत 5 गडी गमावून 387 धावा केल्या. केएल राहुल 102, रोहित शर्मा 159 धावा करून बाद झाले. राहुल आणि रोहितने भारताला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी 227 धावांची भागीदारी केली. दुसरीकडे, खाते न उघडता विराट कोहली याने पहिल्याच चेंडूवर विकेट गमावली. पंतने 16 चेंडूत 39 धावांचे तुफानी डाव खेळला. श्रेयस अय्यर याने 32 चेंडूत 53 धावा केल्या.

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसर्‍या वनडे सामन्यात टॉसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्या वनडे सामन्यात वेस्ट इंडीजने आठ विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला होता.