भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिज (West Indies) संघाविरुद्ध वनडे मालिकेत पहिला विजय मिळवला आहे. विंडीजविरुद्ध पहिला वनडे सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर आजच्या दुसऱ्या सामन्यात 59 धावांनी विजय मिळवला. पावसामुळे व्यत्यय आलेल्या मॅचमध्ये डकवर्थ-लुईस नियमाप्रमाणे विंडीजला विजयासाठी 46 ओव्हरमध्ये 270 धावांची गरज होती. पण, विंडीज केवळ 210 धावांपर्यंत मजल मारू शकला. आजच्या या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालीकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. विंडीजविरुद्ध दुसऱ्या सामन्यात कोहलीच्या आक्रमक खेळीच्या जोरावर भारताने 279 धावांपर्यंत मजल मारली. या सामन्यात कोहलीने वनडे क्रिकेटमधले 42 वे शतक साजरे केले. (IND vs WI 2nd ODI: विराट कोहली याने एकहाती झेल घेत एव्हिन लुईस याला पाठवले तंबूत, पहा)

भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, भारताला चांगली सुरुवात मिळाली नाही. सलामीची जोडी शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांना प्रभावी खेळी करण्यास अपयश आले. धवन 2 तर रोहित 18 धावांवर बाद झाला. पण त्यानंतर कोहलीने धमाकेदार खेळी करत शतक झळकावले आणि संघाची डाव सावरला. कोहलीने 14 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 120 धावा केल्या. चौथ्या क्रमांकावरील रिषभ पंत (Rishabh Pant) देखील सुरभी खेळी करू शकला नाही. त्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने आपल्या पहिल्याच सामन्यात दमदार फलंदाजी केली. श्रेयसने 68 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 71 धावा केल्या. श्रेयसला विंडीजविरुद्ध टी-20 मालिकेसाठी संघात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे आजच्या सामन्यत मिळालेल्या संधिचे त्याने सोने केले हे म्हणणे चुकीची ठरणार नाही.

टीम इंडियासाठी कोहली आणि अय्यर यांनी सर्वाधिक धावा केल्या. तर जलद गोलंदाजी भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याने 4 गडी बाद करत संघाला विजय मिळवण्यात मोलाचे योगदान दिले. कुलदीप यादव याने 10 ओव्हरमध्ये 59 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. दुसरीकडे, विंडीजसाठी लुईसने 65 धावा केल्या तर निकोलस निकोलस पूरन याने 48 धावा केल्या. आपली अंतिम आंतरराष्ट्रीय मालिका खेळात असलेला क्रिस गेल (Chris Gayle) देखील आपली जादू पसरवू शकला नाही. आणि 11 धावांवर बाद झाला.