IND vs WI 2nd ODI: क्रिस गेल याने टाकले ब्रायन लारा याला पिछाडीवर, एकाच दिवसात केली दोन मोठ्या विक्रमांची नोंद
क्रिस गेल (Photo by Alex Davidson/Getty Images)

वेस्ट इंडिज (West Indies) संघाचा धडाकेबाज फलंदाज क्रिस गेल (Chris Gayle) याने देशबांधव आणि महान फलंदाज ब्रायन लारा (Brian Lara) याचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे. भारत आणि वेस्ट इंडिजमधील दुसऱ्या वनडे सामन्यात गेलने 7 धावा करत लारालाही पिछाडीवर टाकत विंडीजसाठी वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड स्थापित केला आहे. युनिव्हर्स बॉस म्हणून ओळखला जाणारा वेस्ट इंडीजचा धोकादायक फलंदाज त्याच्या कारकिर्दीची शेवटची मालिका खेळत आहे. भारत विरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका त्याच्या कारकिर्दीची शेवटची मालिका आहे. 39 वर्षीय कॅरेबियन फलंदाज गेलने आतापर्यंत 299 एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि 37.80 च्या सरासरीने आणि 86.97 च्या स्ट्राईक रेटने दहा हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. भारतविरुद्ध आजचा सामना हा गेलच्या वनडे करिअरमधील 300 वा सामना आहे. गेलने वेस्ट इंडीजसाठी आज डावाची सुरवात करत 24 चेंडूत 1 चौकाराच्या मदतीने 11 धावा केल्या. त्याला भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याने एलबीडबल्यू बाद केले. (IND vs WI 2nd ODI: विराट कोहलीचा सौरव गांगुलीला दे धक्का, एकाच सामन्यात स्थापित केले अनेक रेकॉर्ड)

गेलने आज 7 धावा करत त्याने विंडीजसाठी वनडेमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. याआधी हा विक्रम लाराच्या नावावर होता. लाराने वनडेमध्ये 10405 धावा केल्या आहेत. दरम्यान, विंडीजसाठी 300 वनडे क्रिकेट सामने खेळणार गेल पहिला फलंदाज बनला आहे. याआधी लाराने सर्वाधिक 285 वनडे सामने खेळले होते. पहिल्या वनडेमध्ये गेलची बॅट शांत होती. पण, आजच्या सामन्यात त्याच्याकडून मोठी खेळीची चाहत्यांना अपेक्षा आहे. गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 26 शतक आणि 52 अर्धशतकं केली आहेत. आजच्या सामन्यात शतक करत गेल निवृत्त झालेल्या एबी डिव्हिलियर्स याला मागे टाकून सर्वाधिक शतके ठोकणारा सातवा फलंदाज बानू शकतो.

दुसरीकडे, पहिले फलंदाजी करत टीम इंडियाने विंडीजला विजयासाठी धावांचे 280 लक्ष्य दिले आहेत. आजच्या या सामन्यात कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) च्या जबरदस्त खेळी करत आपले 42 वे शतक पूर्ण केले. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) बाद झाल्यावर पाचव्या क्रमांकावर आलेल्या श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने अर्धशतकी खेळी करत विराटला चांगली साथ दिली.