रोहित शर्मा, विराट कोहली (Photo Credit: PTI)

भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) विराट कोहलीच्या फॉर्मबद्दलची (Virat Kohli Form) चिंता बाजूला सारून माजी कर्णधाराला आत्मविश्वास वाढवण्याची गरज नसल्याचे सांगितले. अहमदाबादमध्ये शुक्रवार, 11 फेब्रुवारी रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) तिसऱ्या वनडेमध्ये कोहली 0 धावांवर बाद झाल्यानंतर रोहितने प्रतिक्रिया दिली. कोहलीने नोव्हेंबर 2019 पासून एकही आंतरराष्ट्रीय शतक झळकावलेले नाही आणि माजी कर्णधाराने वेस्ट इंडिजविरुद्ध 3 सामन्यांच्या मालिकेत फक्त 26 धावा केल्या आहेत. त्याने पहिल्या एकदिवसीय सामन्यात 4 चेंडूत 8 धावा केल्या आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 18 धावांची चांगली सुरुवात केल्यानंतर तो बाद झाला. तर शुक्रवारी, तो अल्झारी जोसेफच्या दुसऱ्या चेंडूवर बाद झाला. एकदिवसीय कर्णधार पदावरून ज्याप्रकारे विराटला काढून टाकण्यात आले त्या सर्व वादानंतर कोहलीने बाहेरील आवाज मागे ठेवला आणि दक्षिण आफ्रिकेतील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत त्याने 2 अर्धशतके ठोकली. (IND vs WI 3rd ODI: रोहित ब्रिगेडकडून वेस्ट इंडिजचा ‘सफाया’, प्रथमच विंडीजचा क्लीन स्वीप करून 3-0 ने मालिका काबीज केली)

तथापि, मायदेशात विंडीजविरुद्ध कोहलीने 2015 नंतर प्रथमच एकदिवसीय मालिकेत 50 पेक्षा कमी धावा केल्या. “विराट कोहलीला आणखी आत्मविश्वासाची गरज आहे का? (हसत),” माजी कर्णधाराला आत्मविश्वास देण्यासाठी संघ पुरेसे प्रयत्न करत आहे का असे विचारले असता रोहितने पत्रकारांना सांगितले. “जर कोहलीला आत्मविश्वासाची गरज असेल, तर संघातील कोणावर विश्वास आहे? मला माहित आहे की त्याने काळापासून शतके केली नाही पण त्याबे अर्धशतक केले आहेत. दक्षिण आफ्रिकेतही त्याने 3 सामन्यात 2 अर्धशतके ठोकली. "त्याला कोणत्याही अतिरिक्त आत्मविश्वासाची गरज नाही. तो पूर्णपणे ठीक आहे. संघ व्यवस्थापन त्याच्या फॉर्मबाबत अजिबात चिंतीत नाही,” रोहित पुढे म्हणाला.

दरम्यान, पूर्णवेळ मर्यादित षटकांचा कर्णधार देखील 3 सामन्यात केवळ 78 धावा करू शकला. पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने मॅच-विनिंग 60 धावा केल्या पण पुढच्या 2 सामन्यात तो लवकर बाद झाला. तथापि, वनडे मालिकेत भारताने प्रथमच वेस्ट इंडिजचा 3-0 असा व्हाईटवॉश पूर्ण केला. रोहित म्हणाला की टॉप 3 वर जास्त अवलंबून राहण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर मधल्या फळीने ज्याप्रकारे कामगिरी केली त्याबद्दल तो विशेषतः आनंदी आहे. विंडीजविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात भारताची अवस्था 42/3 अशी झाली असताना श्रेयस अय्यरने 80 आणि रिषभ पंत 56 धावा करून चौथ्या विकेटसाठी 110 धावांची भागीदारी केली. भारत आणि वेस्ट इंडिज आता 16 ते 20 फेब्रुवारी दरम्यान कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर 3 सामन्यांच्या टी-20I मालिकेत आमनेसामने येतील.