IND vs WI 2019: भारत दौऱ्यासाठी वेस्ट इंडिज संघ जाहीर, कोण In आणि कोण Out जाणून घ्या
(Photo by Gareth Copley/Getty Images)

वेस्ट इंडीज (West Indies) संघ पुढील महिन्यात, डिसेंबरमध्ये भारत (India) विरुद्ध तीन सामन्यांची वनडे आणि टी-20 मालिका खेळणार आहे. दोन्ही संघातील मर्यादित षटकारांची मालिका 6 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. विंडीजच्या या दौऱ्यासाठी आधीच भारतीय संघाची घोषणा झाली होती आणि आता वेस्ट इंडिजनेदेखील वनडे आणि टी-20 संघ जाहीर केला आहे. कीरोन पोलार्ड (Kieron Pollard) वनडे आणि टी-20 संघाचे नेतृत्व करेल. निकोलस पूरन (Nicholas Pooran) टी-20 संघाचा उप-कर्णधार आणि शाई होप (Shai Hope) वनडे संघाचा उप-कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारेल. वेस्ट इंडीज क्रिकेटच्या निवडकर्त्यांनी अलीकडे लखनौमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध खेळलेल्या संघावर विश्वास व्यक्त केला आहे. अफगाणिस्तानविरूद्ध टी-20 मालिकेतील पराभवानंतर विंडीज संघात दोन बदल करण्यात आले आहेत. आगामी टी-20 मालिकेमध्ये वेस्ट इंडीजच्या 15 सदस्यीय संघात फलंदाज शाई होप आणि वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ यांना वगळण्यात आले आहे. (IND vs WI T20I 2019: वेस्टइंडीज टी-20 मालिकेमधून शिखर धवन आऊट, संजू सॅमसन याला मिळाले टीम इंडियात स्थान)

दिनेश रामदिनचा कव्हर म्हणून बोलावलेल्या होपने अफगाणिस्तानविरुद्ध मालिकेत फक्त एक टी-20 सामना खेळला आणि 46 चेंडूत 52 धावा केल्या. अफगाणिस्तानविरुद्ध तीन टी-20 सामन्यात बॉल टेम्परिंगच्या आरोपामुळे निलंबित झालेला पूरण दुसर्‍या टी-20 मॅचपासून उपलब्ध असेल. पहिल्या गेममध्ये गुडघ्याच्या दुखापतीनंतर अफगाणिस्तानविरुद्ध मालिका न खेळू शकलेला फेबियन एलन (Fabian Allen) याचे संघात पुनरागमन झाले आहे. हॅमस्ट्रिंगचा त्रास झालेला दिनेश रामदिनही (Denesh Ramdin) पुन्हा तंदुरुस्त आहे. दुसरीकडे, वनडे मालिकेसाठी निवडकर्त्यांनी अफगाणिस्तानला 3-0 ने पराभूत करणाऱ्या संघाची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, वेस्टइंडीजविरुद्ध घरच्या मैदानावर होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियामध्ये मोठा बदल झाला आहे. शिखर धवन याला दुखापत झाली असल्याने त्याच्या जागी विकेटकीपर बल्लेबाज संजू सॅमसन याला टीममध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.

असा आहे वेस्ट इंडिजचा टी-20 आणि वनडे संघ:

वेस्ट इंडिज टी-20 संघ: कीरोन पोलार्ड (कॅप्टन), फेबियन एलन, शेल्डन कॉटरेल, शिम्रोन हेटिमर, जेसन होल्डर, किमो पॉल, ब्रॅंडन किंग, एविन लुईस, खारी पियरे, निकोलस पूरन,दिनेश रामदीन, शेरफेन रदरफोर्ड, लेंडल सिमंस, केसरिक विलियम्स आणि हेडन वॉल्श जूनियर.

वेस्ट इंडिज वनडे संघ: कीरोन पोलार्ड (कॅप्टन), सुनील अंब्रिस, रोस्टन चेझ, शेल्डन कोटरेल, शिम्रोन हेटिमर, जेसन होल्डर, शाई होप, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, एव्हिन लुईस, कीमो पॉल, खारी पियरे, निकोलस पूरन, रोमारियो शेफर्ड आणि हेडन वॉल्श जूनियर.