भारताच्या आगामी वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यासाठी दोन्ही संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघ (Indian Team) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्या नेतृत्वाखाली विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. संघाचा विंडीज दौरा 3 ऑगस्ट पासून सुरु होत आहे. यादरम्यान दोन्ही संघ 3 टी-20, 3 वनडे आणि 2 टेस्ट सामने खेळतील. आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकमनात दोन्ही संघ पहिल्यांदा आमने-सामने येतील. भारतीय संघात रोहित शर्मा (Rohit Sharma), शिखर धवन (Shikhar Dhawan), कोहली यासारखे तुफान खेळी करणारे खेळाडू आहे तर आपल्या घरच्या मैदानावर खेळण्याचा विंडीज संघाला मोठा फायदा होणार आहे. (IND vs WI: टीम इंडियाविरुद्ध पहिल्या दोन टी-20 सामन्यासाठी सुनील नारायण, केरन पोलार्ड यांची वेस्ट इंडिज संघात वर्णी)
विंडीज संघाने पहिले दोन टी-20 सामन्यासाठी संघाची घोषणा केली आहे, यात सुनील नारायण (Sunil Narine), किरन पोलार्ड (Kieron Pollard) आणि आंद्रे रसेल (Andre Russell) यांना पुन्हा सहभागी करण्यात आले आहे. विंडीज संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी कार्लोस ब्रेथवेट (Carlos Brathwaite) कडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान, यजमान विंडीज संघात असेही काही चेहरे आहेत जे टीम इंडियासाठी भयानक स्वप्न सिद्ध होऊ शकतात. पाहूया कोण आहे ते 5:
जेसन होल्डर (Jason Holder)
जेसन होल्डर एक बहुमुखी ऑलराउंडर आहे जो उजव्या हाताने जलद गोलंदाजी करतो आणि उच्च स्ट्राइक रेटसह धावा काढू शकतो. होल्डर, सध्याच्या विंडीज संघातील सर्वोत्तम अष्टपैलूपैंकी एक आहे. होल्डर बॅट आणि बॉल, दोन्हीने योगदान देऊ शकतो. मागील काही वर्षात पहिले तर होल्डरने गोलंदाजीमध्ये काही फारशी संतोष जनक खेळी केली नाही. पण आपल्या फलंदाजीद्वारे संघात मोठी भूमिका बजावली आहे. होल्डर त्याच्या संघातील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे आणि त्याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा केली जाऊ शकते.
आंद्रे रसेल (Andre Russell)
इंडियन प्रीमियर लीग (IPL)मध्ये दमदार कामगिरी करणारा रसेल गुडघ्याच्या दुखापतीतुन सावरत संघात पुन्हा सहभागी झाला आहे. रसेलला विश्वचषक दरम्यान गुडघ्याला दुखापत झाली होती त्यामुळे सर्व विश्वचषकला मुकावे लागले होते. रसेलने यंदाच्या आयपीएलमध्ये दमदार खेळी केली होती. वेस्ट इंडिजच्या सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटू पैकी एक रसेल संघाला बिकट परिस्तिथीतून बाहेर काढण्यात सक्षम आहे. मसल पॉवर रसेलने यंदाच्या आयपीएलमध्ये तुफान फटकेबाजीने सर्वांचे लक्ष्य वेधले. फिरकी गोलंदाजी अगदी सहज खेळण्याची रसेलमध्ये क्षमता आहे. त्यामुळे भारतीय फिरकी गोलंदाजांना त्याच्या पासून सावध राहावे लागणार आहे.
शॅमरॉन हेटमेयर (Shimron Hetmyer)
शॅमरॉन हेटमेयर, हे नाव वेस्ट इंडिज क्रिकेटमधील सध्या चर्चेत आहे. हेटमेयरने अंडर-19 विश्वचषकमध्ये वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व केले होते. आणि गतजेते भारताला पराभूत करत अंडर-19 विश्वकप जिंकला होता. 2017 पासून हेटमेयर सिनियर विंडीज संघाचा भाग राहिला आहे. 2018 मधील भारत दौऱ्या दरम्यान हेटमेयर वेस्ट इंडिजसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. मागील वर्षी भारतविरुद्ध 5 सामन्यात हेटमेयरने 259 धावा केल्या होत्या. विश्वचषकमध्ये देखील त्याने संतोषजनक खेळी केली आहे. आणि भारतीय गोलंदाजीवर हेटमेयरला आक्रमक फटकेबाजी करण्याची संधी मिळू शकते.
सुनील नारायण
वेस्ट इंडिजचा स्टार स्पिनर सुनील नरेन याने आपला अंतिम टी-20 सामना 2017 मध्ये खेळाला होता. त्यानंतर त्याच्या संशयास्पद गोलंदाजीमुळे चर्चेत राहिला होता. क्रिकेट विश्वातला एक अनुभवी, शांत आणि प्रभावी फिरकी गोलंदाज अशी सुनील नारायण याची ओळख आहे. नारायणच्या समावेशाने विंडीजचे फिरकीचा मारा मजबूत झाला आहे. आणि त्याच्या फिरकी समोर टिकून राहणे हे भारतीय फलंदाजांसमोर आव्हान असणार आहे.
शेल्डन कॉटरेल (Sheldon Cottrell)
वेस्ट इंडिज संघात आगमन करताच कॉटरेलने सर्वांना आपल्या गोलंदाजीने प्रभावित केले आहे. त्याची प्रभावी गोलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण कौशल्य याच्या क्षमतेमुळे तो वनडे क्रिकेटमध्ये एक जबरदस्त खेळाडू आहे. विश्वचकमध्ये देखील तो विंडीज संघाचा मुख्य गोलंदाज होता. त्याने विश्वचषक स्पर्धेत 5.75 च्या सरासरीने 9 विकेट घेतल्या आहेत. कॉटरेलचे सर्वात मोठे शस्त्रम्हणजे त्याची बॉलला वेगवान पद्धतीने दोन्ही बाजूंनी टाकण्याची क्षमता. आणि म्हणून भारतीय फलंदाजांसमोर कॉटरेल एक मोठा धोका बानू शकतो.
दोन्ही संघात मोठी खेळी करणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आहे. त्यामुळे दोन्ही संघातील आगामी टी-20 सामने रंगतदार असतील यात शंका नाही. भारत-वेस्ट इंडिज संघातील पहिले दोन टी-20 सामने फ्लोरिडा च्या काउंटी स्टेडियममध्ये खेळले जातील.