IND vs WI 2019: क्रिस गेल क्रिकेटमधून निवृत्त? 3rd वनडे नंतर 'युनिव्हर्स बॉस' ने केले हे मोठे विधान
क्रिस गेल (Photo Credit: @ICC/Twitter)

वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज क्रिस गेल भारत विरुद्ध वनडे मालिकेनंतर क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे बोलले जात होते. गेलने विश्वचषकनंतर निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र, नंतर मी भारतविरुद्ध मालिकेनंतर संन्यास घेऊ असे जाहीर केले. मात्र, आता त्याने स्वतः निवृत्तीच्या चर्चेमध्ये वेगळीच रंगत निर्माण केली आहे. टीम इंडियाविरुद्ध अंतिम मॅचनंतर निवृत्तीबद्दल विचारण्यात आले असता गेल म्हणाला की, 'मी अजुन निवृत्ती जाहीर केलेली नाही. पुढच्या नोटीसीपर्यंत मी खेळत राहीन.' ICC ने त्याच्या मुलाखतीचा व्हिडीओ शेअर केला आहे. (IND vs WI 3rd ODI: क्रिस गेल याचा अखेरचा सामना, आऊट झाल्यावर टीम इंडियाच्या खेळाडूंनी खास शैलीत केले अभिवादन)

बुधवारी झालेल्या टीम इंडियाविरुद्ध तिसऱ्या आणि अंतिम वनडे सामन्यात गेलने 72 धावांची वेगवान खेळी केली. यामध्ये त्याने 8 चौकार आणि 5 षटकार लावले. त्याने एविन लुईस याच्या साथीने दमदार खेळी करत संघाला चांगली सुरूवात मिळवून दिली. त्याचा स्ट्राईक रेट 179 होता. पण अन्य फलंदाजांच्या अपयशामुळे विंडिजला पराभव पत्करावा लागला, परिणामी विंडीजला मालिका बरोबरीत रोखण्यात अपयश मिळाले. गेल आणि लुईसने शतकी भागीदारी करत विंडीजला चांगली सुरुवात करुन दिली.

गेल आणि लुईस बाद झाल्यावर भारतीय गोलंदाजजी विडिजला २४० धावांत रोखले. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला विजयासाठी २५५ धावांचं आव्हान देण्यात आलं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब झाली. रोहित शर्मा आणि शिखर धवन स्वस्तात बाद झाले. त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी 120 धावांची भागीदारी काली आणि संघाचा डाव सावरला. अय्यर ६५ धावांवर माघारी परतला. तर कोहलीने आपल्या ४३ व्या शतकाची नोंद केली.