IND vs WI 2019 ODI: भुवनेश्वर कुमार याला पुन्हा झाली दुखापत, वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता
(Image Credit: AP/PTI Photo)

वेस्ट इंडिजविरुद्ध नुकतीच टी-20 मालिका जिंकल्यावर आता भारतीय संघ (Indian Team) वनडे मालिका जिंकण्यावर लक्ष केंद्रित करून आहे. भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) मधील पहिला वनडे सामना चेन्नई (Chennai) मध्ये खेळला जाईल. 15 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या या मालिकेसाठी टीम इंडिया चेन्नईमध्ये दाखल झाली आहे. पण, या मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याला पुन्हा एकदा दुखापत झाली आहे आणि त्याच्या मालिकेत खेळण्याबद्दल शंका निर्माण झाली आहे. मुंबई मिररच्या वृत्तानुसार, भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर दुखापतीमुळे वनडे मालिकेत खेळू शकणार नाही. दुखापतीतून परतलेल्या भुविने विंडीजविरुद्ध टी-20 मालिकेतून पुनरागमन केले, पण त्याने वनडे मालिकेआधी संघ व्यवस्थापनाकडे दुखापतीची तक्रार केली आहे. भुवनेश्वर, ज्याच्यासाठी दुखापत अलीकडच्या काळात कायम राहिली आहे, त्याच्यासाठी हा अजून एक धक्का मानला जात आहे.  (ICC T20I Batting Rankings: विराट कोहली याचे टॉप-10 मध्ये पुनरागमन; केएल राहुल यानेही घेतली झेप, रोहित शर्मा च्या क्रमवारीत घसरण)

भुवनेश्वरने विंडीजविरुद्ध तिसऱ्या टी-20 नंतर दुख:ची तक्रार केली. यामुळे, वेस्ट इंडीज विरुद्ध चेन्नईमध्ये वनडे सामन्यातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. संघ व्यवस्थापनाने अद्याप बदलीची पुष्टी केली नाही, परंतु भुवीची दुखापत गंभीर असल्यास संघ-व्यवस्थापन लवकरच बदलीची घोषणा करेल. दरम्यान, अलीकडच्या काळात निवडकर्त्यांनी केलेल्या निवडीनुसार नवदीप सैनी, खलील अहमद आणि शार्दुल ठाकूर यांना त्याच्या जागी संघात स्थान दिले जाऊ शकते.

टीम इंडियासाठी विंडीज मालिकेसाठी हा दुसरा धक्का आहे. यापूर्वी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधील मॅचदरम्यान सलामी फलंदाज शिखर धवन याला दुखापत झाल्याने त्याला टी-20 आणि नंतर वनडे मालिकेतून बाहेर पडावे लागले होते. धवनच्या जागी भारतीय संघात मयंक अग्रवाल याची निवड करण्यात आली. कसोटीत काही काळ तुफानी फलंदाजी करून मयंकने संघ व्यवस्थापनाचा विश्वास जिंकला आणि आता मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये टीम इंडियामध्ये पदार्पण करण्यासाठी त्याची निवड झाली आहे.