Wasim Jaffer (Photo: PTI)

भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) संघ 2 सामन्यांच्या टेस्ट मालिकेत आमने-सामने आहेत. गुरुवारपासून सुरु झालेल्या या मॅचमध्ये पहिल्या दिवशी टीम इंडियाने सहा विकेट गमावत 203 धावा केल्या. भारतासाठी उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने सर्वाधिक धावा केल्या. टॉस गमावल्याने टीम इंडियाला पहिले फलंदाजी करण्यासाठी विंडीजने आमंत्रित केले. पण, भारताची सुरुवात चांगली झाली नाही. चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांसारखे दिग्गज खेळाडू स्वस्तात बाद झाले. मात्र, रहाणेने महत्वपूर्ण अर्धशतक करत संघाचा डाव सावरला. भारत-विंडीजमधील ही मॅच सुरू झाल्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर (Wasim Jaffer) याने टीम इंडियाच्या खेळाडूंना एक ओपन चॅलेंज दिलंय. (IND vs WI 1st Test: अश्विन याला Playing XI मध्ये न घेतल्याने सुनील गावस्कर आश्चर्यचकित, अजिंक्य रहाणे याने केली निर्णयाची पाठराखण)

टीम इंडियासाठी सलामीला आलेल्या 41 वर्षीय जाफरने सोशल मीडिया त्याच्या वेळीच्या एका वेस्ट इंडिज दौर्‍याची आठवण करून देणारा एक फोटो शेअर केला. त्याने अँटिगामध्ये केलेल्या 212 धावांच्या डावाची आठवत करत टीम इंडियाच्या फलंदाजांना ही कामगिरी पुन्हा करण्याचे आव्हान केले. जाफरने ट्विट करत लिहिले की, "2006 अँटिगा (Antigua) मध्ये मी 212 धावा केल्या होत्या. त्या खेळीत एक षटकारही मारला होता. अँटिगामध्ये खेळल्या जाणाऱ्या या टेस्ट मॅचमध्ये मला आशा आहे की एखादा भारतीय माज्या या डावाप्रमाणेच डाव खेळेल, उत्तर द्या माझ्या या पराक्रमाची पुनरावृत्ती कोण करू शकते."

2006 मध्ये खेळण्यात आलेल्या भारत-विंडीजमधील टेस्ट मॅचमध्ये जाफर पहिल्या डावात फक्त एक धाव काढण्यात यशस्वी झाला होता. पण, दुसऱ्या डावात 399 चेंडूवर 221 धावा करत त्याने एक अनोखा रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवला होता. अँटिगाच्या दोन्ही स्टेडियमवर आतापर्यंत एकूण दोन दुहेरी शतके केलेली आहेत. त्यातील एक जाफरने सेंट जॉनमध्ये यांनी केला होता. त्याने सामन्यात 399 चेंडूत 212 धावा केल्या. तर 2016 मध्ये विराट कोहली याने 200 धावांची खेळी केली होती.