कॅरेबियन दौर्यावर टी-20 आणि वनडे मालिका जिंकल्यानंतर, भारतीय संघ (Indian Team) यजमान वेस्ट इंडीज (West Indies) विरुद्ध दोन सामन्यांची टेस्ट मालिका खेळत आहे. या टेस्ट मॅचच्या तिसर्या दिवशीचा खेळ संपताच भारताने विजयाच्या दिशेने पाऊल ठेवले आहे. पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसर्या दिवशी खेळ संपल्यानंतर भारतीय संघाने वेस्ट इंडीजवर एकूण 260 धावांची आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने विजयाच्या दिशेने पाऊल उचलले असले तरी विंडीजच्या पहिल्या डावांत दहाव्या क्रमांकावर आलेल्या फलंदाज मिगुएल कमिंस (Miguel Cummins) याने भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला भरपूर त्रास दिला. (IND vs WI 1st Test: सचिन-सौरव जोडीला मागे सारत विराट कोहली-अजिंक्य रहाणे यांची टेस्टमध्ये रेकॉर्ड कामगिरी)
तिसऱ्या दिवशी विंडीजने 8 बाद 189 धावाअसा पहिला डाव सुरू केला. त्यावेळी खेळपट्टीवर कर्णधार जेसन होल्डर याच्यासह मिगुएल कमिंस होता. यावेळी, कमिंसने एकही धाव केली नव्हती. यानंतर, तिसर्या दिवशी हे दोघे फलंदाजीसाठी आले तेव्हा असे वाटत होते की कमिन्सला भारतीय संघ लवकरच माघारी धारेल. पण, कमिंस तर वेगळ्या विक्रमाची नोंद करण्यासाठी मैदानात उतरला. कमिन्सने टेस्टमधील एका नकोश्या विक्रमाची नोंद केली आणि यामुळे कोहली अजिबात प्रभावित दिसला नाही. सामन्यादरम्यान दहाव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला कमिन्स 95 मिनिटे खेळपट्टीवर राहिला. यावेळी त्याने 45 चेंडूंचा सामना केला, पण त्याला आपले खातेदेखील उघडता आले नाही. यासह त्याने विंडीजकडून टेस्ट सामन्यात सर्वाधिक बॉल खेळून एकही धाव न करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक चेंडूंचा सामना करताना एकही धाव न करण्याच्या यादीत कसिन्स क्रमांकावर आहे.
दरम्यान, कमिन्सच्या या संथ खेळीवर कोहली भडकला. तो स्वत:ला रोखू शकला नाही आणि कमिन्सकडे गेला आणि म्हणाला-"खेळ पुढे न्या, आपण वेस्ट इंडिजमध्ये खेळत आहात, भारतात नाही." कोहलीचे हे शब्द स्टंप माइकमध्ये कैद झाले. कोहलीच्या शब्दांचा अर्थ असा आहे की, जर आपण आपल्या स्वत:च्या घरात खेळत असाल तर धावा करा. भारतात खेळत असता तर बचाव करण्याचे तर्कशास्त्र समजले असते. मात्र कोहलीच्या स्लेजिंगमुळे कमिन्स भडकला नाही आणि तो बचाव करत राहिला. मिगुएलच्या अगोदर विंडीजकडून टेस्ट सामन्यांमध्ये सर्वाधिक बॉल खेळून खाते उघडता न आल्याचा विक्रम कीथ आर्थरटन (Keith Arthurton) याच्या नावावर आहे. 1995 मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर 40 बॉल खेळून इंग्लंडविरुद्ध आर्थर खाते उघडण्यास असमर्थ ठरले होते.