IND vs WI 1st Test: सचिन-सौरव जोडीला मागे सारत विराट कोहली-अजिंक्य रहाणे यांची टेस्टमध्ये रेकॉर्ड कामगिरी; क्रिकेट प्रेमींकडून होतय कौतुक
अजिंक्य रहाणे-विराट कोहली (Photo Credit: Getty)

वेस्ट इंडिज (West Indies) आणि भारत (India) संघातील पहिल्या टेस्ट मॅचमध्ये तिसऱ्या दिवसाखेर टीम इंडियाने 260 धावांची आघाडी मिळवली. तिसऱ्या दिवशी विंडीजला 222 धावांवर बाद करत टीम इंडियाने 75 धावांची आघाडी मिळवली. होती. भारताच्या दुसऱ्या डावांत टीमचे आघाडीचे फलंदाज केएल राहुल, मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा झटपद बाद झाले. भारताने दुसऱ्या डावात 81 धावनावर 3 विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांनी शतकी भागीदारी करत भारताचा डाव सावरला आणि दिवस संपेपर्यंत टीमला 260 धावांची मोठी आघाडी मिळवून दिली. याच दरम्यान, दोन्ही फलंदाजांनी त्यांचे अर्धशतकदेखील पूर्ण केले. (IND vs WI 1st Test Day 3: विराट कोहली-अजिंक्य रहाणे यांची शतकी भागीदारी; तिसऱ्या दिवसा खेर टीम इंडियाकडे 260 धावांची आघाडी)

कोहली आणि रहाणे यांची भागीदारी टीम इंडियासाठी महत्वाची होती. दोंघांनी 112 धावांची भागीदारी केली. दरम्यान, अजून एका शतकी भागीदारीसह विराट-रहाणे यांनी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्या टेस्ट विक्रमाला मागे टाकले. कसोटीत चौथ्या विकेटसाठी आतापर्यंत कोहली आणि रहाणेने सर्वाधिक शतकांची नोंद केली आहे. कोहली-रहाणे जोडीने टेस्टमध्ये आठ शतके केली आहेत तर सचिन-सौरव यांनी सात शतकी भागीदारी केल्या आहेत. विराट-रहाणे यांच्या रेकॉर्डब्रेक कामगिरीमुळे सोशल मीडियावर त्यांचे कौतुक होत आहे.

डाव स्थिर करण्यासाठी कोहली आणि रहाणे यांची धडपड

रहाणे विराट कोहलीसह खूपच चांगला खेळला

दरम्यान, भारताने विंडीजला पहिल्या डावात 222 धावांत गुंडाळलं. यामुळे भारताला 75 धावांची आघाडी मिळाली होती. टीम इंडियासाठी इशांत शर्मा याने 5 तर मोहम्मद शमी आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराह याने एक विकेट काढली. विंडीजसाठी पहिल्या डावांत कर्णधार जेसन होल्डर आणि मिगुएल कमिंस यांनी नवव्या गड्यासाठी 41 धावांची भागिदारी करून संघाला 200 धावांचा टप्पा गाठण्यास सहाय्य केले. होल्डरने 65 चेंडूत पाच चौकारांसह 39 धावा केल्या. तिसऱ्या दिवस अखेर भारताने दुसऱ्या डावात 3 बाद 185 धावा केल्या आहेत.