हैदराबाद येथे खेळल्या जाणार्या पहिल्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडीज (West Indies) ने भारताला (India) 208 धावांचे मोठे लक्ष्य दिले. विंडीजने दिलेल्या या विशाल लक्ष्याचा पाठलाग करत असलेल्या टीम इंडियाने 6 विकेटने विजय मिळवला आहे. टीम इंडियाने हे लक्ष्य 18.4 षटकांत गाठले. भारताने 18.4 षटकांत 4 गडी गमावून 209 धावा केल्या. आंतरराष्ट्रीयटी-20 क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करतानाच हा भारताचा सर्वात मोठा विजय आहे. टीम इंडियासाठी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने सर्वाधिक 50 चेंडूत 94 धावा केल्या. सलामी फलंदाज केएल राहुल (KL Rahul) याने 62 धावांचे योगदान दिले. विराटने 6 षटकार आणि तितकेच चौकार लागले. यादरम्यान राहुलने आंतराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये एक हजार धावादेखील पूर्ण केल्या. राहुलने दुसऱ्या सर्वाधिक एक हजार धावांच्या विक्रमाची नोंद केली. राहुलने 28 धावांमध्ये 1,000 टी-20 धावा केल्या आहेत. दरम्यान, विंडीजने दिलेल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा खरी पियरे याच्या गोलंदाजीवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. पण, त्यानंतर राहुलने विराटच्या साथीने शतकीभागीदारी करत संघाचा डाव सावरला. रोहितने 10 चेंडूत 8 धावा केल्या.
रोहित बाद झाल्यावर कर्णधार कोहली आणि राहुलने पुढाकार घाईत पॉवर प्लेमध्ये भारताची धावसंख्या 50 पर्यंत नेली. यानंतर विराट आणि राहुलने शतकी भागीदारी रचली आणि राहुलने37 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. 62 च्या स्कोअरवर राहुल कॅच आऊट होत माघारी परतला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या रिषभ पंत 9 चेंडूत 18 धावांवर बाद झाला. कोटरेलला पंतला जेसन होल्डर कडे झेलबाद केले. पण, कोहली संघाचा विजय निश्चित करत 35 चेंडूत अर्धशतक ठोकले. यापूर्वी, विंडीजकडून शिमरोन हेटमायर याने 56, इव्हिन लुईस 40, कॅप्टन पोलार्ड 40 आणि ब्रँडन किंग याने 31 धावांचे योगदान दिले. जेसन होल्डर याने केवळ 9 चेंडूत 24 धावा केल्या. वेस्ट इंडिजने आजच्या सामन्यात एकूण 15 षटकार लगावले. दीपक चहर याने त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट कामगिरी करत 4 ओव्हरमध्ये 56 धावा लुटवल्या. युजवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमार यांनी 4 षटकांत 36-36 धावा दिल्या. पण, चहलने पोलार्ड आणि हेटमेयरच्या विकेट घेतल्या.
केसरीक विल्यम्स याने विंडीजकडून सर्वाधिक 60 धावा दिल्या, शिवाय त्याला एकही विकेट मिळाली नाही. करी पियरे याने 2, कीरोन पोलार्ड आणि शेल्डन कॉटरेल याने प्रत्येकी 1 गडी बाद केला.