India National Cricket Team (Photo Credits: Getty Images)

भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) संघातील पहिल्या वनडे सामन्यात टॉस जिंकून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात दोन्ही 43 ओव्हरचा सामान खेळाला जाईल. पावसामुळे टॉस होण्यात उशीर झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. टी-20 मालिकेनंतर टीम इंडियाने आपला मोर्चा वनडे मालिकेकडे वळवला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज गयाना येथे होणार आहे. विश्वचषकमध्ये झालेल्या पराभवानंतर आज पहिल्यांदा एकदिवसीय सामना खेळणार आहे. हा सामना प्रोव्हीडन्स स्टेडियम येथे खेळवण्यात येणार आहे. (Live Streaming of IND vs WI, 1st ODI Match: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Sony Ten आणि SonyLiv Online वर)

आजच्या या सामन्यासाठी भारतीय संघात केदार जाधव, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी यांचे पुनरागमन होणार आहेत. पण, अजूनही चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार हा प्रश्न कायम आहे. रिषभ पंत याने मागील सामन्यात अर्धशतकं केले होते आणि संघाच्या विजयात विजयी योगदान दिले होते. त्यामुळे वनडे मालिकेत देखील त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. श्रेयस अय्यर याला टी-20 मालिकेत संधी मिळाली नव्हती, पण त्याला वनडे संघात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे विंडीजसाठी ही मालिका महत्त्वाची आहे. कारण, वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलची ही अखेरची वनडे मालिका असणार आहे.

असा आहे टीम इंडिया आणि विंडीज संघ:

भारतीय संघ: रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कॅप्टन), रिषभ पंत, श्रेयस अय्यर, केदार जाधव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, खालील अहमद, आणि मोहम्मद शमी

वेस्ट इंडिज संघ: ख्रिस गेल, एव्हीन लुईस, शिमरोन हेटमायर, निकोलस पुरन, रोस्टोन चेस, फॅबियन अ‍ॅलन, कार्लोस ब्रॅथवेट, शेल्डन कॉट्रेल, शे होप, जेसन होल्डर (कर्णधार) केमार रोच.