Live Streaming of IND vs WI, 1st ODI Match: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Sony Ten आणि SonyLiv Online वर
टी-20 मालिकेनंतर भारत आणि वेस्ट इंडिज पुन्हा एकदा आमने-सामने यायला तयार आहे. भारत आणि वेस्ट इंडिजचा आजचा हा सामना तुम्ही ऑनलाइन Sony ESPN आणि SonyLiv Online वर पाहु शकता.
टी-20 मालिकेनंतर भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) पुन्हा एकदा आमने-सामने यायला तयार आहे. दोन्ही संघ आता वनडे मालिकेत एकमेकांशी दोन हाथ करतील. 3 सामन्यांच्या या वनडे मालिकेवर सर्वांचे लक्ष लागून असणार आहे. कारण टी-20 प्रमाणेच वनडेमध्ये देखील भारतीय संघ काही नवीन रेकॉर्ड बनवण्याच्या हेतूने मैदानात उतरतील. भारत आणि वेस्ट इंडिज संघात मोठी खेळी करणारे तडाखेबाज क्रिकेटपटू आहे. त्यामुळे दोन्ही संघातील हा वनडे सामना रोमांचक होईल यात शंका नाही. विंडीज विरुद्ध पहिला वनडे सामना गयानाच्या प्रोविडेंस स्टेडियममध्ये खेळाला जाईल. यापूर्वी या मैदानावर दोन्ही संघात तिसरा टी-20 सामना खेळाला गेला होता. यात भारत विजयी राहिला होता. (IND vs WI ODI 2019: वेस्ट इंडिज विरुद्ध वनडे मालिकेत विराट कोहली याला नवीन इतिहास रचण्याची संधी)
भारत आणि वेस्ट इंडिजचा आजचा हा सामना तुम्ही ऑनलाइन Sony Ten SD/HD आणि Sony Ten 3 SD/HDआणि SonyLiv Online वर पाहु शकता.
आज होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्यात दोन्ही संघात महत्वाचे बदल करण्यात येणार आहे. एकीकडे शिखर धवन (Shikhar Dhawan) दुखापतीनंतर संघात पुनरागमन करत आहे. दुसरीकडे, ख्रिस गेल (Chris Gayle) देखील विंडीज संघात परतला आहे. गेलला टी-20 साठी विंडीज संघात स्थान मिळाले नव्हते. विश्वचषकमध्ये गेल काही खास प्रदर्शन करू शकला नाही. त्यामुळे विंडीजला गेलकडून मोठी खेळी करण्याची अपेक्षा आहे. गेल आणि त्याचा सलामी जोडीदार जॉन कॅम्पबेल (John Campbell) यांच्याकडे संघाला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी असणार आहे. टीम इंडियाचा 'हिटमॅन' रोहित शर्मा (Rohit Sharma) चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने विश्वचषकमधील आपला फॉर्म बनवून ठेवला आहे. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने देखील मागील सामन्यात चांगले प्रदर्शन केले होते. पण भारतासाठी सर्वात मोठे काळजीचे कारण म्हणजे त्यांचे मधली फळी, जी कमकुवत आहे. टीम इंडियाच्या मांडल्या फळीत संघाने प्रयत्न म्हणून युवा खेळाडूंना खेळवण्याचा विचार केला आहे. माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यांच्या गैरहजेरीत भारताची मधल्या फळीची परीक्षा होणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 08, 2019 03:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

