IND vs SL T20I 2021: श्रीलंका संघाने रचला इतिहास, शिखर धवनच्या युवा संघाचा पराभव करत भारताविरुद्ध पहिल्यांदाच केली अशी कमाल
श्रीलंका क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

IND vs SL 3rd T20I 2021: यजमान श्रीलंका (Sri Lanka) संघाविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेच्या तिसऱ्या व अंतिम सामन्यात टीम इंडियाला (Team India) लज्जास्पद पराभवाला सामोरे जावे लागले. आहे. टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत धवन ब्रिगेडने 8 विकेट्स गमावून माफक 81 धावाच केल्या. प्रत्युत्तरात लंकन संघाने 3 विकेट्स गमावून लक्ष्य गाठले व सामन्यासह मालिकाही खिशात घातली. 2019 नंतर दासून शनकाच्या (Dasun Shanaka) नेतृत्वात यमन संघाचा हा पहिला मालिका विजय ठरलं आहे. भारतापूर्वी  इंग्लंड दौऱ्यावर श्रीलंका टीम (Sri Lanka Cricket Team) एकही सामना जिंकू शकली नाही. इतकंच नाही तर भारताविरुद्ध टी-20 मालिकेत श्रीलंकेचा हा पहिला विजय ठरला आहे. यापूर्वी टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध द्विपक्षीय टी-20 मालिका कधीही गमावली नव्हती पण धवन ब्रिगेडही विजयी मालिका मोडीत काढली आहे. (IND vs SL 3rd T20I 2021: अंतिम सामन्यात अखेर श्रीलंकेने मारली बाजी, धवन ब्रिगेडला लोळवत 2-1 ने काबीज केली मालिका)

या पराभवामुळे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भारताच्या 8 मालिकेतील विजयी घोडदौडही संपुष्टात आली.  टी-20 स्वरूपात भारत-श्रीलंका यांच्यातील टक्कर ही भारताच्या बाजूने एकतर्फी राहिली आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघाचा वरचष्मा राहिला आहे. यापूर्वी एक मालिका अनिर्णित राहिली तर अन्य मालिकेत टीम इंडियाने (Team India) वर्चस्व गाजवले होते. मात्र, शिखर धवनच्या युवा भारतीय संघाने लंकन संघाविरुद्ध ही विजयी मालिका खंडित केली व त्यांना पहिल्यांदा मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले. दुसरीकडे, तिसऱ्या आणि निर्णायक टी-20 सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण टीम इंडियाची खराब सुरुवात झाली. सुरुवातीपासून श्रीलंका गोलंदाजांनी विरोधी संघावर वर्चस्व कायम ठेवले व त्यांना फक्त 81 धावांवर रोखले.

कर्णधार धवन पाठोपाठ काही धावांच्या अंतरावर एका पाठोपाठ एक अशा आघाडीच्या व मधल्या फळीतील मातब्बर फलंदाज बाद झाले. परिणामी संघ आव्हानात्मक धावसंख्या उभी करू शकला नाही. भारताने दिलेल्या माफक 82 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात यजमानास संघाने तीन विकेट्स गमावल्या पण अखेर विजयासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या भारताचा पराभव करून  पहिलीवहिली टी-20 मालिका आपल्या नावावर केली.