IND vs SL Pink-Ball Test Day 1: बेंगलोर (Bangalore) येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंका (Sri Lanka) संघाने आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर यजमान भारताचा (India) डाव 252 धावांत आटोपला आहे. घरच्या मैदानावर भारतीय संघाचे (Indian Team) धुरंधर फलंदाजांनी श्रीलंकाई गोलंदाजांपुढे गुडघे टेकल्यावर श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) एकहाती मोर्चा सांभाळला आणि सर्वाधिक 92 धावा केल्या. याशिवाय ऋषभ पंतने 39 धावांचे योगदान दिले. अय्यरने आपल्या खेळीत 10 चौकार आणि 4 मोठे षटकार खेचले. दुसरीकडे श्रीलंकेसाठी लसिथ एम्बुल्डेनिया आणि प्रवीण जयविक्रमा यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. तर धनंजया डी सिल्वाने दोन आणि सुरंगा लकमल याला एक विकेट मिळाली.
Innings Break!
Final wicket of @ShreyasIyer15 falls for 92 as #TeamIndia are all out for 252 in the first innings of the 2nd Test. This will also be the Dinner break.
Scorecard - https://t.co/t74OLq7xoO #INDvSL @Paytm pic.twitter.com/BgSVrpyafO
— BCCI (@BCCI) March 12, 2022