IND vs SL ODI 2021: लेग स्पिनर म्हणून कोण बनणार टीम इंडियाची पहिली पसंत? युजवेंद्र चहल सोबत ‘हा’ युवा शर्यतीत
युजवेंद्र चहल (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs SL ODI 2021: भारतीय संघ (Indian Team) 18 जुलैपासून वनडे मालिकेने श्रीलंका दौऱ्याची (Sri Lanka Tour) सुरुवात करणार आहे आणि यापूर्वी सर्वांच्या मनात एकच प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे की प्लेइंग इलेव्हन लेग स्पिनर म्हणून कोणता गोलंदाज असेल. ते अनुभवी परंतु लयीत नसलेल्या युजवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) प्राधान्य देतील की 21 वर्षीय युवा राहुल चाहरला (Rahul Chahar) लंकन संघाविरुद्ध मोठी जबाबदारी देतील? श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघात या जागेसाठी चहलसोबत राहुल चाहर देखील शर्यतीत आहे. चहलकडे भारताकडून 54 एकदिवसीय सामने आणि 48 टी-20 आंतरराष्ट्रीय सामान्यांचा अनुभव असून त्याने अनुक्रमे 92 आणि 62 विकेट्स घेतल्या आहेत. मधल्या षटकांमधील डावावर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन्ही स्वरूपात तो भारताचा विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे, पण 2019 नंतरच्या त्याच्या कामगिरीत मोठी घसरण दिसून आली आहे. (IND vs SL 2021: शिखर धवनच्या टी-20 वर्ल्ड कप XI मधील स्थानावर भारताच्या दिग्गज खेळाडूचे धक्कादायक विधान, पाहा काय म्हणाले)

चहल टीम इंडियाचा एक मॅच-विनर खेळाडू राहिला आहे पण त्याने अधिक धावा लुटल्या आणि 2019 नंतर त्याच्या इकॉनॉमी रेटमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली. दुसरीकडे, चहलच्या विरुद्ध चाहरने घरगुती क्रिकेट आणि आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी बजावत 2019 मध्ये कॅरेबियनमध्ये भारताच्या टी-20 इलेव्हनमध्ये पदार्पण केले. त्याने तीन टी-20 सामने खेळले आहेत पण अद्याप एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण होणे शिल्लक आहे. एकूणच, चाहरने 64 सामन्यांत 17.7 च्या स्ट्राइक रेट आणि 7.39 च्या इकॉनॉमी रेटने 78 टी-20 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे चहलचा सध्याचा फॉर्म पाहता राहुल दौऱ्यावर टीम इंडियाचा लेग स्पिनर म्हणून पहिली आवड बनू शकतो. गेल्या काही महिन्यांत चहलची कामगिरी सरासरी राहिली आहे. तसेच तो आयपीएलमध्येही फारशी कमाल करू शकला नाही, परंतु जर आपण राहुलबद्दल बोललो तर त्याने मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल 2021 मध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली असून आजार 7 सामन्यात 11 विकेट्स घेतल्या आहेत.

अशास्थितीत श्रीलंकेत आत्मविश्वास वाढवणारी कामगिरी आणि चहल भारतीय संघाचा एक मॅच-विनर म्हणू उदयास येऊ शकतो. शिवाय, पुढच्या अडीच वर्षांत दोन वर्ल्ड टी-20 आणि वर्ल्ड कप स्पर्धा होणार असल्यामुळे राहुल चाहर बॉलने भारताचा ट्रम्प कार्ड सिद्ध होऊ शकतो. मात्र, तोपर्यंत श्रीलंका दौऱ्यावर शिखर धवन आणि संघ व्यवस्थापन युझी व राहुलमध्ये कोणाची निवड करते यावर सर्वांचे लक्ष लागून असणार आहे.