शिखर धवन (Photo Credit: PTI)

IND vs SL ODI 2021: विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या अनुपस्थितीत अनुभवी सलामी फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्याकडे श्रीलंका दौऱ्यावर (Sri Lanka Tour) भारतीय संघाच्या (Indian Team) नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. ऑक्टोबर 2010 मध्ये वनडे पदार्पण केल्यापासून भारतीय संघाचा ‘गब्बर’ ते आता कर्णधारपदापर्यंत धवनने मोठा प्रवास निश्चित केला आहे. 2013 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत धवन पहिल्यांदा टीम इंडियासाठी (Team India) सलामीला उतरला होता. आणि आता सलामी फलंदाज म्हणून पदार्पणाच्या आठ वर्षांनंतर आपली उपस्थिती जाणवल्यानंतर आणि भारताच्या एकदिवसीय सेट अपमध्ये स्थान निश्चित केल्यावर धवन पहिल्यांदा देशाचे नेतृत्व करण्यास मैदानावर उतरेल. 18 जुलैपासून तीन वनडे सामन्यांच्या मालिकेने दौऱ्याची सुरुवात होणार आहे आणि कर्णधार म्हणून मैदानात पाऊल ठेवताच शिखर नवा इतिहास रचेल. (IND vs SL 2021: शिखर धवनच्या टी-20 वर्ल्ड कप XI मधील स्थानावर भारताच्या दिग्गज खेळाडूचे धक्कादायक विधान, पाहा काय म्हणाले)

18 जुलै रोजी श्रीलंकाविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात जेव्हा धवन संघाचे नेतृत्वात करण्यास मैदानावर उतरेल तेव्हा तो कर्णधार म्हणून सर्वात वयस्कर भारतीय कर्णधार ठरेल. यावेळी धवनचे वय 35 वर्ष 225 दिवस असेल. अशाप्रकारे तो 1984 मध्ये पहिल्यांदा संघाचे नेतृत्व करणाऱ्या मोहिंदर अमरनाथ यांचा विक्रम मोडेल. अमरनाथ यांनी 34 वर्ष 37 दिवशी पाकिस्तानविरुद्ध सियालकोट येथे कर्णधार म्हणून पदार्पण केले होते. एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना 18 जुलै रोजी तर दुसरा सामना 20 जुलै रोजी खेळला जाईल. तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना 23 जुलै रोजी होईल. त्यानंतर, टी-20 मालिकेचा पहिला सामना 25 जुलै, दुसरा सामना 27 जुलै आणि तिसरा सामना 29 जुलै रोजी खेळला जाईल. कर्णधार विराट कोहली कसोटी संघासह इंग्लंडमध्ये असल्यामुळे धवन श्रीलंकेत भारतीय संघाचे नेतृत्व करीत आहेत. 13 जुलैपासून मालिका खेळणे निश्चित होते पण श्रीलंकन संघातील कोविड-19 प्रकरणांमुळे एकदिवसीय मालिकेची सुरुवात पुढे ढकलण्यात आली.

पाहा भारताचा वनडे संघ: शिखर धवन (कॅप्टन), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्क्ल, रुतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, नितीश राणा, ईशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), युजवेंद्र चहल, राहुल चाहर, के गौतम, क्रुणाल पांड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), दीपक चाहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया.