गुवाहाटी (Guwahati) टी-20 दरम्यान भारतातील किंवा अन्य कोणत्याही देशाच्या क्रिकेट चाहत्याने हेयर ड्रायर आणि इस्त्रीने ओल्या खेळपट्टीचा भाग सुकवण्याची कल्पनाही केली नसेल. सर्व प्रयत्न करूनही खेळपट्टी वेळेत सुखावली जाऊ शकली नाही ज्यामुळे भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) संघातील वर्षाचा पहिला सामना रद्द करावा लागला. आसाम क्रिकेट असोसिएशन (एसीए) च्या सामन्याच्या तयारीवर बीसीसीआयचे (BCCI) अधिकारी खूप चिडले आहेत. आणि बीसीसीआय आता मुख्य क्युरेटर आशीष भौमिक यांच्या अहवालाच्या प्रतीक्षेत आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने वृत्तसंस्था आयएएनएसशी बोलताना सांगितले की, “गुवाहाटी टी -20 पाहता एएसएचा आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव कमी असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. हे सामन्यासाठी बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांची तयारी नसल्याचेही दर्शवते." (IND vs SL 1st T20I: गुवाहाटी टी-20 सामन्यात पिच सुखावण्यासाठी हेयर ड्रायर आणि इस्त्रीचा वापर केलेला पाहून Netizens ही राहिले थक्क)
श्रीलंकाविरुद्ध वर्षातील पहिल्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला ज्यामुळे सामना सुरु होण्यास उशीर झाला. मात्र, पाऊस थांबल्यावर खेळपट्टी सुखावण्यासाठीड्रायर वापरण्यात आल्याने बीसीसीआयवर कसून टीका केली जाऊ लागली. यावर अधिकाऱ्याने पुढे म्हटले आहे की, "अशा गोष्टी यापुढेही होतील कारण सर्व राज्य संघटना लोढा (Lodha) समितीच्या शिफारशी पूर्णपणे लागू करण्यास पूर्णपणे तयार नाहीत. सध्या राज्य संघटनांनी सातत्य ठेवण्याचे नियोजन करणे सर्वात अवघड असल्याचे सिद्ध झाले आहे.” दरम्यान, आता पहिला सामना रद्द झाल्यावर दोन्ही संघ टी-20 रिंगणात आमने-सामने येतील. हा सामना मंगळवारी, 7 जानेवारीला इंदोरच्या होळकर स्टेडियममध्ये खेळला जाईल.
श्रीलंकाविरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघात (Indian Team) काही बदल करण्यात आले आहे. रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात आली असून रोहितच्या जागी शिखर धवन आणि शमीच्या जागी जसप्रीत बुमराह यांना स्थान देण्यात आले आहे. शिवाय, श्रीलंकाविरुद्ध मालिका धवनसाठी महत्वाची मानली जात आहे. केएल राहुलने सलामी फलंदाज म्हणून आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे, त्यामुळे शिखरला रोहितसह डावाची सुरुवात करण्यासाठी मोठ्या स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे.