IND vs SL 1st T20I: गुवाहाटी टी-20 सामन्यात पिच सुखावण्यासाठी हेयर ड्रायर आणि इस्त्रीचा वापर केलेला पाहून Netizens ही राहिले थक्क
(Photo Credit: Twitter)

भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात झालेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेच्या गुवाहाटीच्या बरसपारा क्रिकेट स्टेडियममधील (Barsapara Cricket Stadium) पहिल्या सामन्याच्या नाट्यमय सुरुवात पाहायला मिळाली. पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. पावसादरम्यान, खेळपट्टीवरील कव्हरच्या आतून पाणी आले, जे अंपायर्सने धोकादायक मानले आणि सामना रद्द केल्याचे जाहीर केले. असे या कारणामुळे केले गेले कि 5-5 षटकांच्या सामन्यासाठी कट ऑफची वेळ 9.46 पर्यंतही सामना सुरु होऊ शकला नाही. स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांसाठी हे निराशाजनक ठरले. मात्र, यामध्ये प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणारे म्हणजे बरसपारास्टेडियमवरील ओली खेळपट्टी सुखावण्यासाठी हेयर ड्रायर, व्हॅक्यूम क्लीनर आणि इस्त्री यासारख्या वस्तूंचा वापर करण्यात आला. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि श्रीलंका संघाचा कर्णधार लसिथ मलिंगा निर्धारित वेळेनुसार टॉससाठी मैदानात आले. वर्ष 2020 चा पहिला टॉस जिंकून विराटने श्रीलंकेला बॅटिंगला बोलावले, पण नंतर पावसामुळे सामना सुरु उशीर झाला. (IND vs SL 1st T20I: वर्षाच्या पहिल्या सामन्यात पावसाची बॅटिंग, भारत-श्रीलंकामधील पहिला टी-20 सामना रद्द)

काही तयार पडल्यावर पावसाने विश्रांती घेतली. त्यांनतर खेळपट्टीची पाहणी करण्यासाठी विराट कोहली (Virat Kohli), शिखर धवन आणि रिषभ पंत बाहेर पडले. त्यानंतर भारतीय कर्णधाराने लक्ष वेधले की खेळात काही पाणी दिसत आहे, शिवाय ओलसर पॅचेसही दिसत आहेत. म्हणून, खेळपट्टीच्या दुरुस्तीसाठी लाइट रोलर आणि व्हॅक्यूम क्लीनर मागवले गेले. आणि नंतर, हेअर ड्रायर आणि इस्त्रीचाही वापरत करण्यात आला. हे सर्व पाहून प्रेक्षकच नाही तर नेटकरी शुद्ध थक्क राहिले आणि मजेदार प्रतिक्रियांनी सोशल मीडियावर देखील पाऊस पडला.

2020 पर्यंत भारत एक सुपर पॉवर होईल

मी 2020 मध्ये माझ्या समान समस्यांचे निराकरण करताना

भारत-श्रीलंका

खेळपट्टी कोरडी होण्याची वाट पाहताना

आत्ता स्टेडियममधील लोक

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड सादर करीत आहे

बीसीसीई जगातील सर्वात श्रीमंत बोर्ड

बीसीसीआयची गुंतवणूक

दरम्यान, फक्त नेटकरीच नाही तर आकाश चोप्रा यांनी याला "शालेय मुलाची चूक" म्हणत असम क्रिकेट असोसिएशनवर (एसीए) निशाणा साधला, तर व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी याला "प्राथमिक चूक" म्हटले.आता दोन्ही संघातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी इंदोरच्या होळकर स्टेडियममध्ये तर अंतिम सामना 10 जानेवारी रोजी पुण्यात होणार आहे.