IND vs SL 3rd ODI 2021: टॉस जिंकल्यानंतर शिखर धवनने ‘कबड्डी शैली’मध्ये साजरा केला आनंद, काही वेळातच व्हिडिओ व्हायरल
शिखर धवनने कबड्डी स्टाईल सेलिब्रेशन (Photo Credit: Twitter)

IND vs SL 3rd ODI 2021: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात खेळल्या जाणार्‍या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा शेवटचा सामना आर प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. टीम इंडिया (Team India) कर्णधार शिखर धवनने (Shikhar Dhawan) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात पाच खेळाडू भारताकडून पदार्पण करीत आहेत. संजू सॅमसन, नितीश राणा, चेतन सकारिया, कृष्णप्पा गौतम, राहुल चाहर टीम इंडियाकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करीत आहेत. नाणेफेक दरम्यान शिखर धवनची बिनधास्त शैली पाहायला मिळाली. शुक्रवारी धवनने तीन सामन्यांच्या मालिकेत पहिल्यांदा कर्णधार म्हणून नाणेफेक जिंकली. नाणेफेक जिंकल्याचा आनंद शिखर धवनने 'कबड्डी स्टाईल'मध्ये साजरा केला. (IND vs SL 3rd ODI: तिसऱ्या वनडेत पावसाचा व्यत्यय; 23 ओव्हरनंतर खेळ थांबवला, भारत 157/3)

धवनला टॉस जिंकण्याचा आनंद साजरा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. धवनच्या या सेलिब्रेशनची शैली पाहून मॅच रेफरी आणि श्रीलंकन कर्णधार दासुन शनाका देखील हसू लागले. भारताने यापूर्वी ही मालिका 2-0 अशी खिशात घातली आहे त्यामुळे धवनच्या नेतृत्वात श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाला क्लीन स्वीप करण्याचा प्रयत्न करेल. या सामन्याबद्दल बोलायचे तर ईशान किशन, क्रुणाल पंड्या, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांना विश्रांती देण्यात आली असून टीम इंडियाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 6 बदल केले आहेत. पाच नवोदित खेळाडूंसह प्लेइंग इलेव्हनमध्ये नवदीप सैनीहा देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी नितीश राणा, राहुल चहर, चेतन सकारिया, कृष्णप्पा गौतम आणि संजू सॅमसन यांना पदार्पणाची संधी देत संघातील जवळपास प्रत्येक खेळाडूला सामना खेळण्याचे निश्चित केले आहे. चाहर आणि सॅमसन यांनी यापूर्वीच भारताकडून टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. दुसरीकडे, श्रीलंकन संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले आहेत. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनकाने टॉस जिंकून पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.