IND vs SL 3rd ODI: तिसऱ्या वनडेत श्रीलंकन कर्णधार दासुन शनाकाला टिप्स देताना दिसले राहुल द्रविड, यूजर्सने फोटो शेअर करत दिल्या अशा रिअक्शन
राहुल द्रविड आणि दासुन शनाका (Photo Credit: Twitter)

IND vs SL 3rd ODI 2021: कोलंबोच्या (Colombo) आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात तीन एकदिवसीय वनडे मालिकेचा शेवटचा सामना खेळला गेला. सामन्यादरम्यान झालेल्या पावसामुळे ओव्हर कमी करण्यात आल्या आणि सामना प्रत्येकी 47 ओव्हरचा खेळण्यात आला. 225 धावा करुन भारताची संपूर्ण टीम ऑलआऊट झाली आणि श्रीलंकेने 3 विकेट्स गमावून 227 धावांचे लक्ष्य गाठले. पावसाच्या दरम्यान श्रीलंका दौर्‍यावर (Sri Lanka Tour) भारतीय संघाचा (Indian Team) प्रमुख राहुल द्रविड (Rahul Dravid) श्रीलंकन कर्णधार दासुन शनाकाला (Dasun Shanaka) टिप्स देताना दिसला. शनाका आणि प्रशिक्षक द्रविड यांच्यातील संभाषण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भारतीय डावाच्या 23 व्या षटकात पाऊस आला आणि खेळ थांबवावा लागला. (IND vs SL 3rd ODI: अखेरचा सामना गमावला, पण टीम इंडियाने मालिका जिंकली; तिसऱ्या वनडेत श्रीलंकाने 3 विकेट्सने मारली बाजी)

माजी भारतीय दिग्गज फलंदाज द्रविड ज्ञानाचा सागर आहे आणि त्याचा फायदा भारतीय खेळाडूंनाच नाही तर तर यजमान लंकन खेळाडूंनीही करून घेतला. शुक्रवारी झालेल्या सामन्यात भारताने 23 ओव्हरमध्ये 3 बाद 147 धावा केल्या होत्या जेव्हा पावसामुळे खेळ थांबवण्यात आला. मुसळधार पाऊस थांबल्यानंतर, खेळपट्टीवरील कर्मचार्‍यांना पाणी काढून कव्हर्स हटवण्यासाठी थोडा वेळ लागला. या दरम्यान द्रविड शनकाशी बोलताना दिसला. दोघांमध्ये कोणत्या विषयावर बोलणे झाले याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही मात्र क्रीकेटिंग धोरणांविषयी दोंघांमध्ये संभाषण असण्याची शक्यता सर्वाधिक आहे. योगायोग म्हणजे पावसामुळे ब्रेकनंतर यजमान संघाने शानदार कमबॅक केलं आणि भारताला 225 धावांवर रोखले.

छान हावभाव!

आनंददायी दृश्य...

स्पिरिट ऑफ क्रिकेट!

उत्तम क्रीडा कौशल्य!

अगदी विलक्षण...

नम्रतेचा आणखी एक धडा!

दरम्यान, शनाकाच्या नेतृत्वात श्रीलंका संघाने तिसर्‍या वनडे सामन्यात सुरुवातीपासून भारतावर पकड आणखी घट्ट केली होती. भारतीय संघासाठी पृथ्वी शॉने 49, संजू सॅमसनने 46 आणि सूर्यकुमार यादवने 40 धावांचे योगदान दिले. सामन्यात भारताने सॅमसन, नितीश राणा, चेतन साकारिया, कृष्णाप्पा गौतम आणि राहुल चाहर यांना एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी दिली होती. दुसरीकडे, श्रीलंकेने त्यांच्या प्ले इलेव्हनमध्ये तीन बदल केले होते. टीम इंडियाकडून एका सामन्यात पाच खेळाडूंनी वनडे पदार्पण केल्याचीही दुसरी वेळ आहे. अखेरच्या वनडे सामना यजमान संघाने खिशात घातला असला तरी शिखर धवनच्या नेतृत्वात भारतीय संघाने 2-1 अशी मालिका खिशात घातली.