विराट कोहली (Photo Credit: Twitter/Getty Images)

भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेचा दुसरा सामना इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने 7 विकेटने सहज विजय मिळवत मालिकेत 1-0 ने अजेय आघाडी घेली. श्रीलंकाविरुद्ध मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. मात्र, दुसऱ्या सामना टीम इंडियासाठी हा सामना खूप चांगला होता आणि संघाने गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी या तिन्ही विभागांत चांगली कामगिरी बजावली. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने टीम इंडियाला षटकारा मारून विजय मिळवला आणि त्यानंतर हेल्मेट काढून रिषभ पंत (Rishabh Pant) याला पाहून डोळा मारला. विराटने विजयासाठी मारलेला षटकाराला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 'रनमशीन'ने लाहिरू कुमार याच्या चेंडूवर माजी कर्णधार कपिल देव यांच्या 'नटराज' स्टाईलमध्ये षटकार लगावला आणि भारताचा विजय निश्चित केला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (IND vs SL 2nd T20I: इंदोर टी-20 मध्ये बनले 10 प्रमुख रेकॉर्ड; जसप्रीत बुमराह, विराट कोहली यांनी मिळवले अव्वल स्थान)

विराट 17 चेंडूत 30 धावांवर नाबाद परतला. भारताने टॉस जिंकून श्रीलंकेला पाहिलेबॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केला. अश्या परिस्थितीत श्रीलंकेने निर्धारित ओव्हरमध्ये 9 बाद 142 धावा केल्या. नवदीप सैनी आणि शार्दूल ठाकूर भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. शार्दूलने 23 धावांवर 3, तर सैनीने 18 धावांवर 2 गडी बाद केले. सैनीने त्याच्या ओव्हरदरम्यान सुंदर यॉर्कर टाकून दनुष्का गुणाथिलाका यांचा त्रिफळा उडवला. विराटने मारलेला विजयी षटकार आणि त्यानंतर पंतला मारलेला डोळा सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत बनला आहे. पाहा हा व्हिडिओ:

दरम्यान, लंकेकडू कुशल परेरा याने 34, अविष्का फर्नांडो याने 22 धावांची खेळी केली. श्रीलंकेने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना शिखर धवन याने केएल राहुल याला चांगली साथ दिली. दोंघांनी पहिल्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली आणि संघाला चांगली सुरुवात करून दिली. राहुलने 32 चेंडूत 6 चौकारांसह 45 धावा, तर धवन 29 चेंडूत 32 धावांवर बाद झाला. युवा फलंदाज श्रेयस अय्यर याने 26 चेंडू 34 धावांसह विराटला चांगली साथ दिली.