विराट कोहलीने केली हरभजन सिंहची नक्कल (Photo Credit: Twitter/@DevanshiBhattB2)

भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेच्या दुसर्‍या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मालिकेतील पहिला सामना गुवाहाटीमध्ये खेळला जाणार होता, मात्र रविवारी पावसामुळे एकही चेंडू न फेकता सामना रद्द करण्यात आला. या मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना 10 जानेवारी रोजी पुण्यात खेळला जाणार आहे. मात्र, इंदोरमध्ये दुसरा सामना सुरू होण्यापूर्वी सराव करताना एक मनोरंजक दृश्यही पाहायला मिळाले. सामन्याआधी जेव्हा भारतीय खेळाडू वॉर्मअप करत होते, तेव्हा मैदानावर एक अनोखे आणि मनोरंजक दृश्य पाहायला मिळाले. भारतीय कर्णधार विराटने हातात चेंडू पकडला आणि गोलंदाजीची तयारी करायला लागला. पण विराटने त्याच्या शैलीत नसून टीम इंडियाचा स्टार स्पिनर हरभजन सिंह (Harbhajan Singh) याच्या गोलंदाजीची नक्कल करताना दिसला तेव्हा तिथे उपस्थित सर्व लोक चकित झाले. विशेष म्हणजे या दरम्यान खुद्द भज्जीही मैदानात उपस्थित होता. (IND vs SL 2nd T20I: विराट कोहली याने जिंकला टॉस, भारताची बॉलिंग; असा आहे टीम इंडिया-श्रीलंकेचा प्लेयिंग इलेव्हन)

कोहलीने भज्जीच्या गोलंदाजीची नक्कल करताच तिथे उभे असलेल्या हरभजननेही त्याच्या गोलंदाजीच्या कृतीची झलक दाखविली. आणि शेवटी, तो त्याच्या परिचित शैलीत डोक्यावर हात ठेऊन उभा राहिला. हे पाहून विराटनेही त्याच्या डोक्यावर हात ठेवला. यानंतर हरभजन आणि विराट दोघेही या जुगलबंदीवर हसताना दिसले. दरम्यान, भज्जी आणि विराट मैदानावत गोलंदाजी करत होते, तेव्हा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीस लक्ष्मण (VVS Laxman) याने यावर मजेदार प्रतिक्रिया दिली. लक्ष्मण म्हणाले, "या प्रकरणात हरभजनला कोणी पराभूत करू शकत नाही." पाहा हा व्हिडिओ:

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, भारताने पुन्हा टॉस जिंकून पुन्हा गोलंदाजीचा निर्णय घेतला, लसिथ मलिंगाच्या नेतृत्वात श्रीलंकेच्या संघाविरुद्ध कोहलीने आपला इलेव्हन मध्ये कोणताही बदल केला नाही. शिवाय, श्रीलंकानेही त्यांच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही.