IND vs SL 2nd T20I: विराट कोहली याने जिंकला टॉस, भारताची बॉलिंग; असा आहे टीम इंडिया-श्रीलंकेचा प्लेयिंग इलेव्हन

गुवाहाटीमधील पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द झाल्यावर भारत आणि श्रीलंका संघ इंदोरच्या होळकर स्टेडियममध्ये दुसऱ्या सामन्यासाठी आमने-सामने येतील. आजच्या सामन्यात टॉस जिंकून भारतीय कर्णधार विराट कोहली याने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

IND vs SL 2nd T20I: विराट कोहली याने जिंकला टॉस, भारताची बॉलिंग; असा आहे टीम इंडिया-श्रीलंकेचा प्लेयिंग इलेव्हन
Indian Cricket Team Players (Photo Credits: IANS)

गुवाहाटीमधील पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द झाल्यावर भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) संघ इंदोरच्या होळकर स्टेडियम (Holkar Stadium) मध्ये दुसऱ्या सामन्यासाठी आमने-सामने येतील. आजच्या सामन्यात टॉस जिंकून भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंदोरमधील सामन्यासाठी दोन्ही संघाच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल झाला नाही. प्लेयिंग इलेव्हनमध्ये शिखर धवन आणि जसप्रीत बुमराह कायम आहे. धवन आणि बुमराह दोघे दुखापतीनंतर भारतीय संघात परतले आहे. या मालिकेत रोहित शर्माला विश्रांती देण्यात आल्याने शिखर केएल राहुलसह भारतीय डावाची सुरुवात करताना दिसणार आहेत. दुसरीकडे, श्रीलंका संघातदेखील कोणताही बदल झाला नाही. (IND vs SL 2nd T20I 2020 Match Live Streaming: भारत विरुद्ध श्रीलंका लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports आणि Hotstar Online वर)

इंदोरमधील टी-20 सामना जिंकून दोन्ही संघ एकमेकांवर दबाव बनवण्याचा प्रयत्न करतील. होळकर स्टेडियममध्ये आजवर एकच टी-20 सामन्यात खेळला गेला आणि तोही श्रीलंकाविरुद्ध होता. यामध्ये भारताने विजय मिळवला होता. ही मालिका सुरू होण्यापूर्वी भारताने श्रीलंकेविरुद्ध मागील पाचही टी-20 सामने जिंकले आहेत. श्रीलंकेने भारताविरुद्धच्या शेवटच्या 10 टी -20 सामन्यांपैकी 8 सामने गमावले आहेत. श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघ नेहमी वरचढ राहिला आणि या मालिकेत ते त्यांचा जुना फॉर्म कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील. दुसरीकडे, श्रीलंकादेखील विजय मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न करतील. यापूर्वी, श्रीलंकेने नंबर एक टी-20 संघ पाकिस्तानचा क्लीन-स्वीप करत धक्कादायक विजय मिळवला होता, मात्र नंतर त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. आणि आता वर्षाच्या पहिल्या मालिकेत श्रीलंका विजय मिळवण्याच्या हेतून मैदानात उतरेल.

असा आहे भारत-श्रीलंकेचा प्लेयिंग इलेव्हन:

भारत: विराट कोहली (कॅप्टन), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर.

श्रीलंका: लसिथ मलिंगा (कॅप्टन), अविष्का फर्नांडो, दनुष्का गुणथिलाका, कुसल परेरा, ओशादा फर्नांडो, भानुका राजपक्षे, धनंजया डी सिल्वा, दासुन शनाका, इसुरु उदाना, वनिंदू हसरंगा आणि लाहिरू कुमारा.

(The above story first appeared on LatestLY on Jan 07, 2020 06:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).