
भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील तीन टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज, मंगळवारी इंदोरच्या (Indore) होळकर स्टेडियम (Holkar Stadium) वर खेळला जाईल. गुवाहाटी येथे दोन संघांमधील पहिला सामना रविवारी पावसामुळे रद्द करण्यात आल्याने टीम इंडिया हा सामना जिंकून मालिकेमध्ये आघाडी मिळवू इच्छित असेल. भारत-श्रीलंका होळकर स्टेडियममध्ये सीरिजच्या दुसर्या टी-20 सामन्यासह नवीन वर्षाच्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. आता मालिकेत फक्त दोन टी -20 सामने शिल्लक आहेत आणि विजयाच्या उद्देशाने दोन्ही संघ मैदानात उतरतील. आजच्या सामन्यात भारतीय संघाकडून शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांच्यावर विशेष लक्ष असेल. दोन्ही खेळाडू दुखापतीतून सावरल्यानंतर पुन्हा मैदानात परतले आहेत. शिखरवर या मालिकेत प्रभावी कामगिरी करण्यासाठी अतिरिक्त दबाव आहे. केएल राहुल याने शिखरच्या अनुपस्थितीत स्वत:ला सलामी फलंदाज म्हणून सिद्ध केले आहे आणि त्याचा नियमित साथीदार रोहित शर्मा सध्या विश्रांती घेत असल्याने शिखरसमोर धावा करण्याचे आव्हान असेल. (गुवाहाटी टी-20 सामन्यात हेयर ड्रायरद्वारे पिच सुखावण्याचे फोटो पाहून भडकले BCCI अधिकारी, पाहा काय म्हणाले)
श्रीलंकाविरुद्ध टीम इंडियाचा दुसरा टी-20 सामना मंगळवारी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजेपासून खेळला जाईल, तर संध्याकाळी 6.30 वाजता टॉस होईल. हा सामना भारतीय क्रिकेट चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता. या मॅचची लाईव्ह स्ट्रीमिंग आपण हॉटस्टारवर पाहू शकता.
द्विपक्षीय टी-20 मालिकेमध्ये श्रीलंकेविरूद्ध भारत वरचढ राहिला आहे आणि या मालिकेतही हा विक्रम कायम ठेवण्याचा टीम इंडिया प्रयत्न करेल. श्रीलंका संघ कमकुवत जरी दिसला तरी तो स्पर्धा देऊ शकतो. श्रीलंकाने टी-20 मध्ये अव्वल स्थानी असलेल्या पाकिस्तानचा पराभव केला होता, मात्र त्यान्ना ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे, श्रीलंका वर्षाची सुरुवात गोड करू पाहत असेल.
असा आहे भारत-श्रीलंका संघ
भारत: विराट कोहली (कॅप्टन), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, संजू सैमसन, रिषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी आणि वॉशिंगण सुंदर.
श्रीलंका: लसिथ मलिंगा (कॅप्टन), कुसल परेरा, दनुष्का गुणथिलाका, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, ओशादा फर्नांडो, दासुन शनाका, अँजेलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, कुसल मेंडिस, वनिंदू हसरंगा, लक्षन संदकन, धनंजया डी सिल्वा, लाहिरू कुमारा, ईसूरु उदाना.