विराट कोहली, लसिथ मलिंगा (Photo Credit: Getty)

श्रीलंका (Sri Lanka) विरुद्ध इंदोरच्या होळकर स्टेडियममधील दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने (India) एकतर्फी विजय मिळवला आणि श्रीलंकेचा 7 विकेटने धुव्वा उडवला. या विजयसह भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. भारताकडून केएल राहुल (KL Rahul) याने सर्वाधिक 45 तर शिखर धवन याने 22 धावा केल्या. श्रीलंकेने टॉस गमावून पहिले फलंदाजी करत भारतासमोर 143 धावांचे लक्ष्य ठेवले होते आणि यजमान संघाने सहज विजय मिळवला. श्रीलंकेसाठी वनिंदूं हंसरंगा (Wanindu Hasranga) याने 2 गडी बाद केले. लाहिरू कुमारा (Lahiru Kumara) याने 1 गडी बाद केला. 143 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने 71 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर पहिला विकेट गमावला. 45 धावा करणाऱ्या राहुलला हासरंगामी बोल्ड करत माघारी धाडले. धवन आणि राहुल यांनी केवळ 31 चेंडूंत टीम इंडियाच्या 50 धावा पूर्ण केल्या. यानंतर धवनच्या रूपात टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला. हसरंगानेच धवन 32 धावांवर एलबीडब्ल्यू बाद केले. भारताकडून विराट कोहली (Virat Kohli) 30 आणि रिषभ पंत 1 धावांवर नाबाद परतले. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने विराटला चांगली साथ दिली आणि 34 धावांवर बाद झाला. (IND vs SL 2nd T20I: जसप्रीत बुमराह याने श्रीलंकाविरुद्ध घेतली 1 विकेट, आर अश्विन आणि युजवेंद्र चहल यांची केली बरोबरी)

याआधी भारतीय कर्णधार कोहलीने नाणेफेक जिंकून श्रीलंकेला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. श्रीलंकेने 20 ओव्हरमध्ये 9 बाद 142 धावा केल्या. शार्दुल ठाकूर याने भारताकडून सर्वाधिक 3 गडी बाद केलं. कुलदीप यादव आणि नवदीप सैनी यांनी प्रत्येकी 2-2 गडी बाद केले. शार्दूलने 19 व्या ओव्हरमध्ये तीन गडी बाद केले. त्याने डी सिल्वा आणि उदाना त्यानंतर ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर मलिंगालाही बाद केले. कोहली आणि श्रीलंकाई कर्णधार लसिथ मलिंगा यांनी इंदोर सामन्यासाठी गुवाहाटी टी-20 मधील प्लेइंग इलेव्हन कायम ठेवला होता.

आता दोन्ही संघ 10 जानेवारीला पुणे स्टेडियममध्ये अंतिम आणि निरणाऱ्य टी-20 सामन्यात आमने-सामने येतील. एकीकडे टीम इंडिया मालिका जिंकू पाहिलं, तर श्रीलंकामालिका ड्रॉ करण्याचा प्रयत्न करेल.