संजू सॅमसन (Photo Credit: PTI)

IND vs SL 2nd T20I 2021: भारतीय संघ (Indian Team) श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) कोलंबो (Colombo) येथे सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना खेळत आहेत. कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह आणि अन्य आठ खेळाडू आयोलेशनमध्ये असल्याने संघाला आजच्या दुसऱ्या सामन्यात उपस्थित खेळाडूंसोबत मैदानात उतरण्यास भाग पाडले आहे. कृणाल पांड्याच्या संपर्कात आल्यामुळे ईशान किशन देखील क्वारंटाईन असल्यामुळे सामन्यात विकेटकीपर म्हणून संजू सॅमसनला (Sanju Samson) संधी देण्यात आली आहे. पण पुन्हा एकदा युवा भारतीय फलंदाज संधीचा फायदा करून घेऊ शकला नाही आणि अगदी वाईटपणे बाद होऊन माघारी परतला. सॅमसनची सातत्यपूर्ण खराब कामगिरी पाहून सोशल मीडियावर नेटकरी देखील भडकले आणि खालीलप्रमाणे प्रतिक्रिया दिल्या. (IND vs SL 2nd T20I 2021: भारताकडून पदार्पण करत Devdutt Padikkal याचा विक्रम, ‘हा’ विशेष 'कारनामा' करणारा बनला पहिला भारतीय फलंदाज)

कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात केरळच्या धडाकेबाज यष्टीरक्षक-फलंदाज सॅमसनने आंतरराष्ट्रीय स्तरावर फलंदाजीने निराश केले आहे. भारताने केवळ पाच तज्ज्ञ फलंदाजांसोबत लढाई लढत असताना सॅमसनवर पुढाकार घेण्याची संधी होती, पण श्रीलंकेच्या फिरकीपटू विरोधात सॅमसनने गुडघे टेकले. फिरकीपटूंना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर वानिंदू हसरंगा, अकिला धनंजय यांनी सॅमसनला संघर्ष करायला लावला व अखेर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. अकिला धनंजयाने संजू सॅमसनला केवळ 7 धावांवर तंबूत पाठवलं. 17 व्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर सॅमसनला त्याच्याकडे पुढे येत खेळताना पाहून धनंजयाने उत्कृष्ट फिरकी चेंडू फेकला ज्याने सॅमसनला चकवले आणि त्याचा त्रिफळा उडवला. भारतासाठी हा सॅमसनचा नववा टी-20 डाव असून त्याने आजवर अनुक्रमे 19,6,8,2,23,15,10,27 आणि 7 अशा धावांची नोंद केली आहे.

पाहा सॅमसनच्या कामगिरीवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

संजू सॅमसनची टी-20 कारकीर्द

संजू सॅमसन ड्रॉप करा!

सॅमसन आणखी एक मनीष पांडे बनेल...

जेव्हा जेव्हा लोक त्याच्याकडे पाहतात!

सॅमसन खरोखरच सुसंगत आहे

सॅमसन तू करत आहेस?

दरम्यान, हा सामना मंगळवार, 27 जुलै रोजी होणार होता. मात्र, भारताचा अष्टपैलू कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने हा सामना एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला. तसेच कृणालच्या संपर्कात आलेले खेळाडूही आयसोलेशनमध्ये असल्याने 4 खेळाडूंना आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली आहे. भारताकडून रुतुराज गायकवाड, देवदत्त पडीक्कल, नितीश राणा आणि चेतन सकारिया या चार खेळाडूंनी टी-20 पदार्पण केले आहे.