IND vs SL 2nd T20I 2021: 28 जुलै रोजी भारत-श्रीलंकाचा दुसरा टी -20 सामना खेळण्यावरही सस्पेन्स, असे झाल्यास रद्द होईल मालिका
भारत विरुद्ध श्रीलंका (Photo Credit: PTI)

IND vs SL 2nd T20I 2021: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेचा दुसरा सामना मंगळवारी रात्री कोलंबोच्या (Colombo) आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाणार होता, परंतु या सामन्याआधी टीम इंडियाचा (Team India) फिरकी अष्टपैलू क्रुणाल पांड्याची (Krunal Pandya) कोरोना चाचणी सकारात्मक आढळल्यानंतर सामना स्थगित करण्यात आला. या नंतर बीसीसीआयने (BCCI) म्हटले की, आता दुसरा सामना 28 जुलै रोजी म्हणजे बुधवारी खेळला जाईल, परंतु हा सामना बुधवारी होणार की नाही याबाबत सस्पेन्स कायम आहे. आता बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आपली ओळख जाहीर न करण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, कोविड चाचणीत क्रुणाल पांड्या सकारात्मक सापडला आहे आणि आजचा सामना रद्द झाला आहे. त्याचबरोबर ते म्हणाले की आता अन्य भारतीय खेळाडूंच्या आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल अपेक्षित आहे. यात सर्व खेळाडू स्पष्ट दिसल्यास बुधवारी फक्त दुसरा सामना आयोजित केला जाईल. (IND vs SL 2nd T20I 2021: भारतीय क्रिकेटपटू क्रुणाल पांड्या कोरोना संक्रमित; श्रीलंकेबरोबर ‘या’ दिवशी खेळला जाणार दुसरा टी-20, BCCI ची घोषणा)

म्हणजेच इथे एक गोष्ट स्पष्ट होते की, जर आणखी दुसरा खेळाडू सकारात्मक आला तर दुसरा सामना आयोजित केला जाणार नाही. क्रुणाल पांड्याचा आठ खेळाडूंशी जवळचा संपर्क असल्याचे वैद्यकीय पथकाने स्पष्ट केले आहे. त्याच्या संपर्कात असलेले आठ सदस्यांना आयसोलेट कारण्यात आले आहेत. दरम्यान, दुसरा सामना आता बुधवारी आणि तिसरा सामना 29 जुलै रोजी म्हणजे गुरुवारी खेळला जाईल, असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे. त्याच बरोबर हा देखील प्रश्न उद्भवतो की, जर कृणालशिवाय इतर कोणताही खेळाडू सकारात्मक आढळला तर कदाचित 28 जुलै रोजीचा सामना रद्द केला जाऊ शकतो. 28 चा सामना रद्द झाल्यावर 29 चा सामना कसा होईल, असा मोठा प्रश्न उपस्थित होतो. दुसरीकडे, पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव यांची इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी निवड झाली आहे, पण आता दोघे ब्रिटन दौर्‍यावर कसोटी मालिकेसाठी कधी व कसे रवाना होतील असा मुख्य प्रश्नाचे उत्तर सध्या बीसीसीआय शोधात असेल.

इंग्लंड दौऱ्यावर 4 ऑगस्टपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. यापूर्वी खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात आवेश खान व वॉशिंग्टन सुंदर यांना दुखापत झाल्यामुळे दौऱ्यातून पाय मागे घ्यावा लागला. त्यानंतर पृथ्वी व सूर्यकुमार यादवला दौऱ्यावर पाठवण्याची बीसीसीआयने घोषणा केली.