IND vs SL 2nd T20I 2021: श्रीलंकेचं जोरदार प्रत्युत्तर, भारतावर 4 विकेटने मात करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी
भारत विरुद्ध श्रीलंका (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs SL 2nd T20I 2021: कोलंबो (Colombo) येथील दुसऱ्या टी-20 सामन्यात यजमान श्रीलंका (Sri Lanka) संघाने मालिकेत दणदणीत पुनरागमन करत शिखर धवनच्या भारतीय संघाला  (Indian Team) पराभवाचा दणका दिला आहे. टीम इंडियाने (Team Idnia) दिलेल्या 133 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात लंकन संघाने 19.4 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून लक्ष्य सध्या केले आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे. लंकन संघासाठी सलामी फलंदाज मिनोद भानुकाने 36 धावा काढल्या. संघाच्या विजयात धनंजय डी सिल्वाने (Dhananjay de Silva) नाबाद 40 धावांची कामगिरी बजावली तर चमिका करुणारत्ने 12 धावा करून नाबाद परतला. दुसरीकडे, टीम इंडियासाठी कुलदीप यादवने सर्वाधिक 2  विकेट्स काढल्या. तसेच भुवनेश्वर कुमार, चेतन सकारिया, वरुण चक्रवर्ती व राहुल चाहर यांनी प्रत्येकी एक विकेट काढली. (IND vs SL 2nd T20I 2021: धनंजयाच्या इनस्विंगने संजू सॅमसन याला चकवलं, भारतीय फलंदाजाच्या विकेटने उमटल्या अशा प्रतिक्रिया)

दरम्यान, धावांचा पाठलाग करताना श्रीलंका संघाला नियमित अंतराने विकेट्सचा फटका बसला. संघ नियम अंतराने विकेट्स गमावत राहिला. अविष्का फर्नांडोने 11 धावा केल्या तर वनिंदू हसरंगाने 15 धावा काढल्या. शिवाय, एकावेळी भारतीय संघ सामना जिंकेल असे दिसत होते पण चमिका करुणारत्ने आणि डी सिल्वा यांनी भारताच्या आशेवर पाणी फेरले व संघाला विजय मिळवून देत मालिकेत बरोबरी करून दिली. यासह आता दोन्ही संघातील मालिका विजयाचा निर्णय आता उद्या, 29 जुलै रोजी तिसऱ्या व अखेरच्या टी-20 सामन्यात होईल. लक्षात घेण्यासारखे म्हणजे भारतीय संघाने यापृवी तीन सामन्यांच्या ओनिडा मालिकेत 2-1 असा विजय मिळवला होता.

दुसरीकडे, श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिले फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाची चांगली सुरुवात झाली. भारताकडून कर्णधार शिखर धवनने 42 चेंडूत 40 धावा केल्या. शिखर पाठोपाठ  देवदत्त पडिक्क्ल16 व्या ओव्हरमध्ये बाद झाला. त्यापाठोपाठ सतराव्या षटकात संजू सॅमसन आणि नितीश राणा स्वस्तार तंबूत परतले. तर भुवनेश्वर कुमारने 11 चेंडूत 13 धावा केल्या. भारताने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 132 धावसंख्या गाठली.