IND vs SL 2021: टीम इंडियासाठी खुशखबर, श्रीलंका दौऱ्यावर Hardik Pandya ‘या’ भूमिकेसाठी करतोय तयारी

IND vs SL 2021: श्रीलंका दौऱ्यावर (Sri Lanka Tour) भारतीय संघ (Indian Team) तीन सामन्यांची वनडे आणि टी-20 मालिका खेळण्यासाठी सज्ज आहे. या मालिकेपूर्वी भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) टीम इंडियाच्या (Team India) सध्या सुरु असलेल्या तयारी आणि त्यापुढील योजनांबद्दल माध्यमांशी संवाद साधला. प्रश्नांची उत्तरे देताना त्याने अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) संबंधित अतिशय महत्वाची माहिती शेअर केली. अष्टपैलू हार्दिक बऱ्याच वर्षांपासून गोलंदाजी करत नाही आणि तो सातत्याने गोलंदाजी करू शकत नसल्याने बरेच प्रश्न निर्माण झाले आहे. याविषयी सूर्यकुमारला विचारण्यात आले आणि मालिकेदरम्यान तो गोलंदाजी करताना दिसू शकतो असे त्याने उत्तर दिले. सराव सामन्यादरम्यान अष्टपैलूने नेटमध्ये गोलंदाजी केली आणि सराव सामन्यात देखील गोलंदाजी केली. मंगळवार, 6 जुलै रोजी भारतीय संघात नुकतंच स्थान मिळवलेल्या प्रतिभावान फलंदाज सूर्यकुमारने मीडियाच्या प्रश्नांची उत्तरे दिली. (IND vs SL Series 2021: पृथ्वी शॉने श्रीलंका दौऱ्यावर सहखेळाडूंना दिली चेतावणी, म्हणाला- ‘राहुल द्रविड सर असल्याने ड्रेसिंग रूममध्ये शिस्तीची अपेक्षा’)

“तो नेट्समध्ये गोलंदाजी करत आहे आणि [सोमवारी] इंट्रा-स्क्वॉड सामन्यातही त्याने गोलंदाजी केली. परंतु ते त्याबद्दल कसे जायचे आहेत हे त्याच्या आणि संघ व्यवस्थापनाचा निर्णय आहे. पण, तो गोलंदाजी करत आहे आणि ही चांगली बाब आहे,” यादवने व्हर्च्युअल संवाद दरम्यान माध्यमांना सांगितले. हार्दिकने आयपीएलच्या दरम्यान मुंबई इंडियन्सकडून गोलंदाजी केली नसली तरी त्याने यज्ञा मार्च महिन्यात इंग्लंडविरुद्ध भारतासाठी मर्यादित षटकांच्या सामन्यात गोलंदाजीत हात साफ केला. “पांड्याने इंग्लंड मालिकेत गोलंदाजी केली. 'इंडियन प्रीमियर लीग' (आयपीएल) दरम्यान त्याने गोलंदाजी केली नाही कारण तो टीम मॅनेजमेंट आणि हार्दिकचा निर्णय होता,” यादव पुढे म्हणाला.

इंग्लंडविरुद्ध पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने 17 ओव्हर गोलंदाजी केली आणि तीन विकेट्स घेतल्या. पांड्याने इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यातही गोलंदाजी केली होती आणि तो किफायतशीर ठरला होता.

27 वर्षीय हार्दिकने 60 वनडे आणि 48 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. दरम्यान, भारतीय संघ, नियमित कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवि शास्त्रीविना श्रीलंकेत दाखल झाला आहे. संघाचे नेतृत्व अनुभवी सलामीवीर शिखर धवन करीत आहेत तर प्रशिक्षक राहुल द्रविड प्रशिक्षक आहेत.