IND vs SL 1st Test Day 1: भारत विरुद्ध श्रीलंका पहिली कसोटी बनली Milestone मॅच, मोहाली टेस्टच्या पहिल्या दिवशी बनलेल्या प्रमुख विक्रमांवर एक नजर टाका
विराट कोहली-रिषभ पंत (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs SL 1st Test Day 1: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील पहिला सामना आजपासून मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन IS बिंद्रा स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारतीय संघाचा (Indian Team) नवा कसोटी कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाने (Team India) 6 बाद 357 धावांपर्यंत मजल मारली होती. भारताकडून ऋषभ पंतने (Rishabh Pant) सर्वाधिक 96 धावा चोपल्या. तर हनुमा विहारी 58, आणि 100 वी कसोटी खेळणाऱ्या विराट कोहलीने (Virat Kohli) 45 धावा केल्या. या सामन्यात पाहुणा श्रीलंका संघ (Sri Lanka Team) सुरुवातीपासून बॅकफूटवर राहिला. भारतीय खेळाडूंच्या तुफानी खेळीने श्रीलंकाई गोलंदाजांना विकेटसाठी जोरदार संघर्ष करायला लावला. तसेच भारत आणि श्रीलंका यांच्यातील मोहाली कसोटीचा पहिला दिवस महत्वपूर्ण विक्रमांनी भरलेला राहिला. (IND vs SL 1st Test Day 1: मोहाली कसोटीत श्रीलंका बॅकफूटवर; Rishabh Pant याची आतषबाजी, पहिल्या दिवसाखेर टीम इंडिया मजबूत स्थितीत)

1. भारताविरुद्ध मोहालीच्या IS बिंद्रा स्टेडियमवरील पहिला सामना श्रीलंका संघाचा 300 वा कसोटी सामना आहे. कसोटी सामन्याचे तिहेरी शतक करणारा श्रीलंका सातवा संघ ठरला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विश्वविक्रम इंग्लंडच्या नावे आहे ज्यांनी आतापर्यंत 1045 सामने खेळले आहेत.

2. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना माजी कर्णधार विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 100 वा सामना आहे. कसोटी सामन्यांचे शतक करणारा विराट 12 वा भारतीय खेळाडू ठरला आहे.

3. भारताविरुद्ध मोहाली कसोटीत श्रीलंका कर्णधार दिमुथ करुणारत्ने 75 वा कसोटी सामना खेळत आहे.

4. आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 40 पेक्षा अधिक कसोटी सामने खेळणारा भारताचा नवीन कर्णधार टेस्ट मॅचमध्ये प्रथमच कर्णधार म्हणून मैदानात उतरला आहे. यापूर्वी रोहितकडे वनडे आणि टी-20 संघाची कमान देखील देण्यात आली आहे.

5. श्रीलंकेविरुद्ध मोहाली कसोटी सामन्यात रोहित शर्मा याने कसोटी कर्णधार म्हणून पदार्पण केले आणि भारताचा दुसरा वयस्कर कसोटी कर्णधार ठरला. भारतासाठी सर्वाधिक वयात कसोटी कर्णधार म्हणून पदार्पण करण्याचा विक्रम अनिल कुंबळे यांच्या नावे आहे. कुंबळे यांनी 37 वर्ष 36 दिवसांत पहिल्यांदाच भारताचे कसोटी क्रिकेटमध्ये नेतृत्व केले.

6. भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने मोहाली कसोटीच्या पहिल्या डावात तुफानी फलंदाजी करून 97 चेंडूत 4 षटकार आणि 9 चौकारांसह 96 धावा केल्या. पंत भारतीय भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्यांदा नव्वदीच्या स्कोअरवर बाद झाला आणि त्याने सुनील गावस्कर यांची बरोबरी केली. आपल्या कसोटी कारकिर्दीत गावस्कर भारतीय भूमीवर एकूण चार ‘नर्व्हस 90’चे शिकार झाले होते.

7. मोहालीत 100 वा कसोटी सामना खेळणाऱ्या विराट कोहलीने कसोटी कारकिर्दीतील 8000 धावा पूर्ण केल्या आहेत. यासह कोहली राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, VVS लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग आणि सुनील गावस्कर यांच्या यादीत सामील झाला आहे ज्यांनी कसोटी सामन्यांमध्ये 8,000 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. कोहलीने 168 व्या डावात 8000 धावांचा हा आकडा गाठला असून हा टप्पा सर करणारा तो सर्वात जलद 5वा भारतीय फलंदाज ठरला आहे.