भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) संघातील तीन सामन्यांच्या मालिकेचा पहिला टी-20सामना गुवाहाटीच्या बरसपारा क्रिकेट स्टेडियमवर लवकरच सुरू होईल. गुवाहाटी मॅचमध्ये टॉस जिंकून भारतीय कर्णधार विराट कोहली याने टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 सामन्यात खेळलेल्या खेळाडूंमध्ये तीन बदल झाले आहे. सलामी फलंदाज रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांनी विश्रांती देण्यात आली असून, दीपक चाहर याला दुखापतीमुळे मालिकेला मुकावे लागले आहे. दीपकच्या जागी नवदीप सैनी (Navdeep Saini) याला संधी देण्यात आली आहे. रोहितला विश्रांती देण्यात आल्याने त्याच्या जागी शिखर धवन (Shikhar Dhawan) याला स्थान दिले आहे आणि तो केएल राहुल याच्यासह डावाची सुरुवात करेल. भारताने वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांची दोन फिरकीपटू म्हणून निवड केल्याने रवींद्र जडेजा याला वगळण्यात आले आहे. युजवेंद्र चहल यालाही स्थान मिळाले नाही. (IND vs SL: पहिल्या टी-20 आधी विराट कोहली याला फॅनने दिली खास भेट, जुन्या मोबाईल फोनने बनविले 'किंग कोहली'चे चित्र, पाहा Video)
वर्ष 2020 मधील दोन्ही संघाची ही मालिका असल्याने दोन्ही संघ विजयाने सुरुवात करू पाहिलं. दुसरीकडे, श्रीलंकेच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये अँजेलो मॅथ्यूज याला संधी मिळाली नाही. मॅथ्यूजने तब्बल 18 महिन्यानंतर श्रीलंकेच्या टी-20 संघात पुनरागमन केले आहे. श्रीलंकेला त्यांच्या गोलंदाजीवर लक्ष द्यायची गरज आहे. श्रीलंकेने एकीकडे पाकिस्तानचा त्यांच्या घरच्या मैदानावर खेळत टी-20 मालिकेत पराभव केला, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामना करावा लागला.
असा आहे भारत-श्रीलंकेचा प्लेयिंग इलेव्हन:
भारत: विराट कोहली (कॅप्टन), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर.
श्रीलंका: लसिथ मलिंगा (कॅप्टन), अविष्का फर्नांडो, दनुष्का गुणथिलाका, कुसल परेरा, ओशादा फर्नांडो, भानुका राजपक्षे, धनंजया डी सिल्वा, दासुन शनाका, इसुरु उदाना, वनिंदू हसरंगा आणि लाहिरू कुमारा.