भारत विरुद्ध श्रीलंका (Photo Credit: PTI)

IND vs SL 1st T20I Live Streaming: वेस्ट इंडिज विरोधात वनडे आणि टी-20 या दोन्ही मालिकेतील विजयानंतर, रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया (Team India), आज गुरुवार, 24 फेब्रुवारीपासून मायदेशात श्रीलंकेचा (Sri Lanka) पाहुणचार करेल. दोन्ही संघ मालिकेच्या पहिल्या टी-20 सामन्यात लखनऊच्या (Lucknow) एकाना स्टेडियममध्ये आमनेसामने येतील. त्यानंतर शनिवारी आणि रविवारी अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या टी-20 साठी धर्मशाला येथे रवाना होतील. वेस्ट इंडिजचा 3-0 असा पराभव केल्याने भारतीय संघ मोठ्या उत्साहात आहे, तर श्रीलंकेला ऑस्ट्रेलियाविरुद्ध दणदणीत पराभव पत्करावा लागल्याने लंकन वाघ कंकुवत दिसत आहे. त्याचबरोबर संघातील काही खेळाडू दुखापतीमुळे तर काही कोरोनामुळे उपलब्ध नाही आहेत. दरम्यान, भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) पहिल्या टी- सामन्याच्या लाइव्ह टेलिकास्ट आणि ऑनलाईन स्ट्रीमिंगची सर्व माहिती खालीलप्रमाणे आहे. (IND vs SL 1st T20I: ईशान किशन की ऋतुराज गायकवाड, सलामीसाठी कोण असणार पहिली पसंत; Rohit Sharma पुन्हा करणारा टीम इंडियात मोठा उलटफेर?)

भारत विरुद्ध श्रीलंका पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना लखनऊच्या एकना स्टेडियमवर भारतीय संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. भारत विरुद्ध श्रीलंका पहिला टी-20 सामना स्टेडियममध्ये जाऊन पाहण्यास अधिकृत परवानगी नसल्यामुळे भारतीय प्रेक्षकांसाठी स्टार स्पोर्ट्स 1 आणि स्टार स्पोर्ट्स 1 HD वर थेट प्रसारित जाईल. तसेच Disney + Hotstar अॅप आणि वेबसाइटवर भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या टी-20 सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल, पण यासाठी क्रिकेट चाहत्यांना या अॅपची सदस्यता घेणे गरजेचे आहे. यासह, हा भारतीय संघाचा एक लहान स्वरूपाचा आंतरराष्ट्रीय सामना असल्यामुळे भारतीय प्रेक्षक DD Sports वर या मॅचला थेट आनंद घरी बसल्या लुटू शकतात.

भारत विरुद्ध श्रीलंका टी- संघ

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, व्यंकटेश अय्यर, रवींद्र जडेजा, हर्षल पटेल, रवी बिष्णोई, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, दीपक हुडा, आवेश खान, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल.

श्रीलंका संघ: दासुन शनाका (कर्णधार), पथुम निसांका, दानुष्का गुनाथिलका, कामिल मिश्रा (विकेटकीपर), चमिका करुणारत्ने, दिनेश चंडीमल, चरित असलंका, जेफ्री वेंडरसे, प्रवीण जयविक्रमा, दुष्मंथा चमीरा, लाहिरू कुमारा, जेनिथ लियानागे, आशियान डॅनियल, शिरन फर्नांडो आणि बिनुरा फर्नांडो.