IND vs SL 1st T20I 2021: कोलंबोच्या (Colombo) आर. प्रेमदासा स्टेडियमवर सुरु असलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने (India) यजमान श्रीलंकेला (Sri Lanka) विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य दिले आहे. भारताकडून सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) 34 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांसह 50 धावा ठोकल्या. सूर्यकुमार यादवच्या टी-20 कारकीर्दीतील हे चौथे अर्धशतक होते आणि या सामन्यात त्याने माजी क्रिकेटर गौतम गंभीरला (Gautam Gambhir) पछाडले. सूर्यकुमार यादव टीम इंडियाच्या मधल्या फळीतील एक दमदार फलंदाज म्हणून उदयास येत आहे. सामना दर सामना त्याचा खेळ सुधारत आहे. यादवने आतापर्यंत भारतासाठी चार टी-20 सामन्याच्या तीन डावात 46.33 च्या सरासरीने एकूण 139 धावा केल्या आहेत. त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम धावसंख्या 57 धावा असून सूर्यकुमारने आता टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीतील पहिल्या तीन डावांमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.
त्याने पहिल्या तीन डावांमध्ये 109 धावा करणाऱ्या गौतम गंभीरला मागे टाकले आहे. सूर्यकुमारने या एलिट भारतीय फलंदाजांच्या यादीत पहिले स्थान पटकावरले आहे तर अन्य फलंदाजांमध्ये अनुक्रमे सुरेश रैना, रोहित शर्मा व मनदीप सिंह यांचा समावेश आहे. दरम्यान, रविवारी कोलंबो येथे श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने पाच बाद 164 धावा केल्या. भारताकडून सूर्यकुमार यादवने 50 धावा काढल्या तर कर्णधार शिखर धवनने 46 धावांचे योगदान दिले. तत्पूर्वी, धवनने दुसऱ्या विकेटसाठी संजू सॅमसन सोबत 51 धावांची भागीदारी केली व नंतर सूर्यकुमारच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी 62 धावांची निर्णायक भागीदारी केली. हार्दिक पुन्हा एकदा निराश केले व 12 चेंडूत 10 धावा करत चमीराच्या चेंडूवर विकेटकीपरकडे झेलबाद होऊन माघारी परतला. श्रीलंकेकडून दुश्मंता चामीरा आणि वनिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
FIFTY for SKY! 👏 👏
His 2⃣nd half-century in T20Is. 👍 👍 #TeamIndia #SLvIND
Follow the match 👉 https://t.co/GGk4rj2ror pic.twitter.com/wa4GS4QnBi
— BCCI (@BCCI) July 25, 2021
दुसरीकडे, या सामन्यात सूर्यकुमार यादवने 5 चौकार आणि 2 शानदार षटकार लगावले. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 147.06 होता. त्याचबरोबर त्याच्या पहिल्या तीन टी-20 डावातील हे दुसरे अर्धशतक ठरले. यापूर्वी त्याने इंग्लंडविरुद्ध टी-20 पदार्पण करत अर्धशतक झळकावले होते. शेवटच्या तीन टी -20 आंतरराष्ट्रीय डावात त्याने अनुक्रमे 57, 32 आणि 50 धावा केल्या आहेत.